*तीघांवर संचारबंदीसह ३२४ नुसार गुन्हा नोंद*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील मानकादेवी येथील नवनाथ महादू देवकते,महादेव नवनाथ देवकते,सदाशिव नवनाथ देवकते यांनी घरासमोर येऊन विनाकारण भांडण करत डोके फोडून गंभीर जखमी केल्यावरून सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,तालुक्यातील मानकादेवी येथे शेती व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह भागवणारे भरत दिगंबर देवकते यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की,त्यांनी त्यांच्या जागेत जनावरे बांधली असता गावातील नवनाथ देवकते,महादेव देवकते,सदाशिव देवकते यांनी एकत्र येत घरातून बाहेर काढून खिडकीच्या गजाने डोक्यात मारून डोके फोडत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.या त्यांच्या फिर्यादीवरून आरोपीतांविरुद्धस सोनपेठ पोलीस स्थानकात भा.द.वी.३२४,५०४,५०६(३४)तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २६९,२७०,२७१(५१ ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय देवराव मुंडे करत आहेत.
COMMENTS