*सोनपेठ पोलीस ठाण्यासमोर फिर्यादीचा आक्रोश!*

सबलाईन:-* तालुक्यातील खडका येथील विवाहितेचे मृत्यू प्रकरण; सोनपेठ पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह!* प्रतिनिधी/सोनपेठ माहेरून व्यवसायासाठ...

सबलाईन:-* तालुक्यातील खडका येथील विवाहितेचे मृत्यू प्रकरण; सोनपेठ पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह!*


प्रतिनिधी/सोनपेठ


माहेरून व्यवसायासाठी पैसे आणण्याच्या कारणावरून खडका येथील एका विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ होत होता. अखेर या त्रासातून सदर विवाहित पुनम यादव हिने 31 मार्च 2020 रोजी खडका येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने तिचे वडील दत्ता साहेबराव पोळ यांच्या फिर्यादीवरून एकूण पाच आरोपींच्या विरोधात ४ एप्रिल रोजी कलम ४९८-ए, ३०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील सर्वच आरोपींना आटक न करता सोनपेठ पोलिसांकडून त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या गंभीर प्रकरणी एकंदरीत तपास यंत्रणेचे कार्य पाहता सोनपेठ पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे


सोनपेठ तालुक्यातील खडका येथील पुनम वामनराव यादव हिचा मृत्यू ३१ मार्च २०२० रोजी नैसर्गिक परिस्थितीत गळपास घेतल्याने झाला असून गळफास घेण्यामागे तिचा होत असलेला शारीरिक व मानसिक छळ, तसेच वेळोवेळी होणारी पैशाची मागणी हीच कारणे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदरची घटना घडून तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी सोनपेठ पोलिसांना वरील पैकी एकाही आरोपीला अद्याप पर्यंत अटक करता आले नाही अथवा आरोपी मिळून आला नाही. ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल. याप्रकरणी सदरचे आरोपी नेमके कुठे आहेत? याबाबत फिर्यादी पौळ यांनी सोनपेठ पोलिसांना वारंवार भ्रमणध्वनीवरून लोकेशन देण्याचा प्रयत्न केला.परंतु सोनपेठ पोलिसांनी जाणीवपूर्वक आपला फोन उचलला नसल्याचा आरोप दत्ता पोळ यांनी केला आहे.


या घटनेला आज दीड महिना पूर्ण होऊन सुद्धा आरोपीला पोलिसांकडून अटक होत नसल्याचे कारणावरून पाच दिवसापूर्वी फिर्यादी दत्ता पौळ हे पोलीस स्टेशन येथे आले होते यावेळी त्यांनी सोनपेठ ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे व तपास अधिकारी सपोनि श्री भिकाने यांच्या समोर पोलीस स्टेशन च्या प्रांगणात आक्रोश केला. माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीतून पाठीशी घालतआहात अशी गर्जना केली. यावेळी सोनपेठ पोलिसांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही तपास कार्य करत असून, आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसल्याचे सोनपेठ पोलिसांनी दिलेले लाजिरवाने उत्तर पाहून सोनपेठ पोलिसांच्या तपास कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहणे यात नवल काय? असेच म्हणावे लागेल. गेली दीड महिन्यापासून या घटनेतील सर्वच आरोपी अद्याप पर्यंत सोनपेठ पोलिसांना मिळून येत नाहीत यामागचे खरे गौडबंगाल काय? असा प्रश्न कोनालाही पडल्याशिवाय राहाणार नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता या प्रकरणावरून सोनपेठ पोलीस व त्यांचे कार्य या महत्वपुर्ण बाबतीत जिल्हा पोलिस अध्यक्ष कृष्णकांत उपाध्याय लक्ष घालतील काय?असा सवाल येथील सुजाण नागरिकांना पडल्याचे दिसून येत आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group