शेतीच्या वाटणीवरून लातूर रोड येथील् दुर्दैवी घटना
चाकूर पोलिसांनी मुलाला केली
लातूर (प्रतिनिधी) : लातुर रोड (ता.चाकूर) येथील शेतीच्या वाटणीच्या कारणावरून ऐन पितृदिनाच्या पूर्वसंध्येला चाकूर पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गुंडप्पा मारापल्ले यांचा डोक्यात फरशी फेकून त्यांच्या मुलानेच निर्घुन खून केल्याची तक्रार भावाने पोलीसात दिल्यावरून पोलीसांनी मुलाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. खुनी मुलास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, लातूररोड (ता.चाकूर) येथील पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गुंडप्पा मालापल्ले यांना शुक्रवारी (दि.१९ जून)च्या सकाळी ११ वाजन्याच्याच्या सुमारास त्यांच्या मुलाने फरशीच्या तुकड्याने डोक्यात मारून जखमी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे भाऊ उत्तम गुंडप्पा मारापल्ले व त्याचा मुलगा राजकुमार मारापल्ले हे दोघेंजण घराकडे आले असता चंद्रकांत मारापल्ले हे बाजेवर बेशुद्ध पडलेले होते. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता. चंद्रकांत मारापल्ले हे बेशुध्द असल्यामुळे त्यांना चाकूर येथील खासगी रूग्णालयात व तेथून पुढील उपचारासाठी लातूरला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
लातुर येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान शनिवार दि.२० जून रोजी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास चंद्रकांत गुंडप्पा मारापल्ले यांचा मृत्यू झाला. मुलगा धनंजय हा पत्नी, मुलासह वेगळे रहायचे आहे व मला शेताची वाटणी द्या म्हणून सतत भांडण करीत होता. यातूनच त्याने वडीलांचा खून केला असल्याची तक्रार भाऊ उत्तम मारापल्ले यांनी पोलीसात दिल्यावरून पोलीसांनी मुलगा धनंजय चंद्रकांत मालापल्ले यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करून मुलाला अटक केली आहे.
COMMENTS