- मंगळवारी नवीन ४ व्यक्ती पॉझिटिव्ह ; एका ५ वर्ष्याच्या बालकाचाही समावेश
नांदेड (global marathwada)
कोरोना आजारातून आज ७ व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविध्यालय विष्णुपुरी नांदेड येरहील ५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील १ व औरंगाबाद येथे संदर्भित असलेला १ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २४५ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या एकुण ४० अहवालापैकी सर्वच्या सर्व २८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन ४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या ३२१ एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये बिलालनगर येथील ५० वर्षाची १ महिला आणि नांदेड येथील १महिला तसेच ३५ वर्षाचा शहरातील बोरबन फॅक्टरी येथील १ पुरुष तर समर्थ नगर सोलापूर येथील ५ वर्षाचा बालक देखील पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हे सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत ३२१ बाधितांपैकी २४५ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत ६२ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील ४ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय ५० व ५२ वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात ६२ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १०, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून ६ बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. मंगळवारी ८९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
- जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
- आत्तापर्यंत एकूण संशयित – ५७८१
- एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या – ५३९७
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण – ३११२
- अजून निरीक्षणाखाली असलेले – १२५
- पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – २४
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले – ५३७३
- आज घेतलेले नमुने – ७०
- एकुण नमुने तपासणी – ५८१८
- एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ३२१ (पैकी ०४ संदर्भीत आलेले आहेत)
- पैकी निगेटीव्ह – ५०५८
- नमुने तपासणी अहवाल बाकी – ८९
- नाकारण्यात आलेले नमुने – ९१
- अनिर्णित अहवाल – २५३
- कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – २४५
- कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – १४
- जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी १४६२२८ राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.ग्लोबल मराठवाडा टीम
COMMENTS