प्राचार्य डॉ. कोप्पोलू हरिबाबू व्यंकटेश्वरलू यांचा जन्म दि. १२ जुलै १९६३ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शाळा येल्लारेडी जि. निजामाबाद, उच्च माध्यमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मधुमलय्या ज्यू. कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालय बोधन जि. निजामाबाद, इंग्रजी विषयात पदव्युतर शिक्षण फर्ग्युशन कॉलेज पुणे येथे झाले. त्यानंतर १९८९ मध्ये भारतीय वायुसेनेतील शिक्षण घेतले. १९९० मध्ये त्यांनी एम. फील. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९१ मध्ये ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयात इंग्रजी विषयांचे प्राध्यापक कालांतराने विभागप्रमुख म्हणून कार्य केले तर अलीकडेच ते याच महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले.
प्राचार्य डॉ. के.हरिबाबू हे महाविद्यालयीन जीवनात अनेक उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी दक्षिण भारतात ८२ दिवस सायकल प्रवास केला. अनेक गाव व शहराना भेटी दिल्या. जीवन जगताना शरीर हे सुदृढ असले पाहिजे यासाठी त्यांनी व्यायामाला महत्व दिले. महाविद्यालयात असताना त्यांना बेस्ट बॉडी बिल्डर अवार्ड मिळाला होता. महाविद्यालयात असताना ते विद्यार्थी संसदेचे सचिव होते. पदवीच्या परीक्षेत ते महाविद्यालयातून प्रथम आल्याबद्दल त्यांना ५००रु. चा रघुपती रेड्डी स्मृती पुरस्कार मिळाला होता.
१९९१ मध्ये डॉ. के. हरिबाबू हे शरदचंद्र महाविद्यालय नायगाव येथे इंग्रजी विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. याठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर व्यायामाचे धडे दिले तर विद्यार्थ्यासोबत मित्रात्वाचे संबंध जोडत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते ओळखले जातात. १९९५ मध्ये त्यावेळेस नायगाव सारख्या ग्रामीण भागात त्यांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी ब्लू बेल्स इंग्लीश मेडीयम स्कूल ची सुरुवात केली.या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले. सामान्य व गोरगरीबाची मुले आता इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.प्राचार्य डॉ. के. हरिबाबू हे थंडीच्या दिवसात आपल्या कुटुंबासह निर्मल या गावी गेले होते. एका ठिकाणी त्यांना थंडीत कुडकुडत असलेला एक व्यक्ती दिसला तेव्हा त्यांनी आपल्या गाडीमध्ये असलेली एक चादर त्या व्यक्तीला पांघरली. तो व्यक्ती आनंदी झाला.त्या व्यक्तीला चादर दिलेले पाहून इतरही फुटपाथवरली माणसे यांच्याकडे येवून चादरीची मागणी केली. त्यावेळी डॉ. हरिबाबू यांनी आपल्या गाडीमध्ये असलेली सर्व चादर या लोकांना वाटप केली.
" अश्रूमध्ये पाणी नाही वेदना असतात " ही आईची शिकवण त्यांना आठवली आणि त्यांदृष्टीने गोरगरीब फुटपाथवर जीवनात जगणाऱ्या लोकांच्या वेदना दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.करत आहेत. दरवर्षी ठिकठिकाणी आंध्रप्रदेशातील काही ठिकाणी व नायगाव, नरसी परिसरातील फुटपाथवरील लोकांना थंडीच्या दिवसात ते चादर वाटप करीत असतात. नायगाव बा. येथील नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्य करीत असतात. माणसाप्रमाणे ते पशु प्राण्यावरही प्रेम करीत असतात. त्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती पाहून उन्हाळ्यामध्ये नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतशिवारात पाणवठे बांधण्याचे कार्यात सहभागी होतात. प्राचार्य डॉ. के. हरिबाबू यांचे सर्व कुटुंब उच्च शिक्षित असून त्यांचे वडील हे सहाय्यक कृषी संचालक होते. भाऊ श्रीनिवास नायडू हे आर. टी. ओ. एजंट आहेत. वडील बहीण जिनिया कुमारी हया सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. तर एक बहीण गृहीणी आहेत. अलीकडेच प्राचार्य डॉ. के. हरिबाबू यांचे वडील कोप्पोलू व्यंकटेश्वरलू यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना अतीव दुःख झाले. सातत्याने वडिलांच्या प्रकृतीकडे ते लक्ष देत.त्यांचे वडिलांप्रती असलेले प्रेम हे त्यांच्या संवेदनेतून दिसून येते. अशा कुटुंबवत्सल, संवेदनशील व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देऊया...!
*शंकर बोईनवाड*
*पत्रकार, उदगीर*

COMMENTS