- भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सन्मान
- पोलीस निरीक्षक,डॉक्टर,शाखा अभियंता यांचा सन्मान
माजलगांव (प्रतिनिधी):- भ्रष्टाचार निर्मुलन समिती शाखा बीड यांच्या वतीने माजलगांव येथील कोव्हिड १९ च्या काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर,पोलीस अधिकारी,विधुत शाखा अभियंता यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
कोव्हिड १९ च्या खडतर काळात डॉक्टर,पोलीस आणि विद्युत पुरवठा नियमित देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे त्यासाठी अनेक पोलीस,डॉक्टर आणि विधुत विभागाचे अधिकारी कर्मचारी २४ तास कार्यन्वित आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या शाखा बीड वतीने माजलगांव येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी शहराचे सामाजिक आरोग्य चांगले ठेवल्याबद्दल त्याचबरोबर माजलगांव तालुक्यातील पात्रुड येथील डॉक्टर वसीम मनसबदार यांनि कोव्हिड च्या काळात २४ तास रुग्णाची सेवा सुरू ठेऊन गोरगरीब रुग्णाची सेवा सुरू ठेवली आणि रुग्णावर उपचार सुरु ठेवले व नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर केरोनाचा काळात नागरिकांना लाईट ची गैरसोय होऊ नये म्हणून विधुत विभागाने कायम उल्लेखनीय कामगिरी बजावली व अखंडित विद्युत पुरवठा नागरिकांना पुरवला त्यामुळे येथील विधुत वितरण मधील विजय उत्तमराव कुलकर्णी , यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समितीचे राजेसाहेब कचवे, फड साहेब परमेश्वर सोळंके ,लक्ष्मण सोनवणे धारुर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोळंके, माजलगांव तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड ,धनंजय माने व इतर आदी ची उपस्थित होती.
COMMENTS