प्रभारी गटशिक्षणाधिकारी महामुनी यांच्या कडचा पदभार काढला, मानवी हक्क अभियानचा दणका - ढगे,जाधव..
माजलगाव (प्रतिनिधी) येथील प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री महामुनी यांच्या कामाची चौकशी करून, त्यांच्यावर कार्यवाही करणेस वरीष्ठ पातळीवरील अधीकारी जाणीवपूर्वक अतीविलंब करत असल्यामुळं, त्यांचाच वरदहस्त त्यांच्या पाठीशी असल्याचं निष्पण होत आहे. त्यामुळ आता या सर्व प्रकरणाचा न्यायालयीन लढा व आमरण उपोषण करणार असा गर्भीत ईशारा देताच श्री.महामूनी यांच्या कडचा तडकाफडकी पदभार काढण्यात आला. जर त्यांच्याकडचा पदभार काढला नाही तर,जिल्हापरीषद वरीष्ठ कार्यालय व शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना जवाबदार धरण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अशोक ढगे व विवेक जाधव या तक्रार कर्त्यांनी केल होते.
मानवी हक्क अभियान ता.शाखा माजलगाव जि बीडच्या वतीने गेली नउ दहा महिण्यापासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी महामुनी यांच्या भ्रष्ट,अनियमीततेच्या कामकाजाच्या विविध तक्रारीचा पाढा,स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीवर वाचून सुद्धा, त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही.याबाबतीत विविध स्वरूपाचे अंदोलने केली. येथील शिक्षण विभागात त्यांचे लक्ष गुणवत्ता विकासावर असणे आवश्यक असताना त्या, बाबीला ते दुय्यम व भष्ट्राचाराला मात्र प्रथम पसंती देतात.त्यांच्याच काळात, या कार्यालयात कधी नव्हे ते गुन्हे अन्वेशन शाखेकडून धाड टाकली गेली व येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना निलंबित व्हावं लागलं.हंगामी ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीचे बस्तीगृहे मोकाट सोडल्या गेले.या व अशा अनेक योजनेत या ठिकाणी भष्ट्राचार व अनियमतता होत असल्याचे आम्ही गेली अनेक महिने निर्देशित करत अहोत.याची दखल घेतल्याचा बनाव वरिष्ठ अधिकारी अम्हांस लेखी स्वरूपात पत्र देऊन करत होते.जणू काही त्यांना कायद्याची कोणतीच भिती नाहीय ! कारण त्यांनी अम्हांस जे वेळोवेळी लेखी अश्वासन दिलीत त्याप्रमाणे कोणतीच कार्यवाहि झाल्याचे दिसत नव्हते. ३मार्च२०२० रोजी मा. शिक्षणाधिकारी ( प्रा ) यांनी लेखी अश्वासन दिले की दहा ते पंधरा दिवसात संबंधीताकडील पदभार काढण्यात येऊन त्यांची चौकशी करण्यात येईल.आपण मा.जिल्हाधीकारी कार्यालयासमोरील आपले अमरण ऊपोषण मागे घ्यावे. आम्ही या लेखी अश्वासनानंतर आमचे अंदोलन त्या वेळी मागे घेतले.परंतू आज कोरोणा महामारीतून सर्व जिल्हा सावरत असताना, सर्व कार्यालयीन कामकाज सुरु झाले आहे.त्यामुळ आम्ही वरीष्ठ कार्यालयाना लेखी ईमेलव्दारे संबंधीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी महामुनी यांचा पदभार काढणे व चौकशी करणे संदर्भाने काय कार्यवाही करण्यात आली आहे याची विचारणा केली. परंतु त्या ईमेलचे उत्तर मिळत नव्हते. याचाच अर्थ महामुनी यांच्या एकंदरीत कारभारास,वरीष्ठ अधिकाऱ्यांचाच वरदहस्त,सहकार्य व पाठींबा असल्याचे निष्पण होताना दिसत असल्यामुळं आम्ही दि.17.06.2020 पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन देताच आज त्यांच्या कडचा अतिरीकक्त पदाचा कार्यभार काढून श्री बेडसकर यांच्याकड देण्यात आल्याचे सांगितले.आता शिक्षण विभागातील भष्ट्राचारास आळा बसेल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नसल्याचे मानवी हक्क अभियानचे विवेक जाधव व अशोक ढगे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पञकान्वये कळवले आहे.....
COMMENTS