*आता उठवू सारे रान*
किसानपुत्र आंदोलनाची नवी मोहीम
*तुम्ही जरूर सहभागी व्हा*
---------------------------------------------
उद्या 18 जून- शेतकरी पारतंत्र्य दिन
या दिवसापासून किसानपुत्र एक नवी मोहीम सुरू करीत आहेत. तिचे नाव 'आता उठवू सारे रान' प्रत्येक किसानपुत्राने आपल्या स्वतः च्या फेसबुक वॉल वर live करायचा. विषय एकच *'शेतकरी स्वातंत्र्यासाठी शेतकरीविरोधी (सिलिंग, आवश्यक वस्तू आदी) कायदे रद्द करा"* या एकमेव विषयावर बोलायचे. हवा तेवढा वेळ बोलायचे. पाहिजे त्या भाषेत बोलायचे. हे बोलताना, शेवटी दुसर्याचे नाव सुचवायचे. मग त्यानेही बोलून पुढचे नाव सुचवायचे. एक मात्र लक्षात ठेवा हे live करताना किंवा केल्या नंतर लिंक शेयर करताना #किसानपुत्रआंदोलन लिहायला विसरू नका. हे लिहिल्याने तुमचा व्हिडीओ आम्हालाही पाहता येईल. सगळ्या किसानपुत्रांचे व्हिडीओ एकत्र होतील.
मित्रानो, सरकारने कायदे करून, ते राबवून, शेतकऱयांना गुलाम केले आहे. हा कायद्यांचा गळफास सोडवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. प्रत्येक किसानपुत्राची आहे. आपण गेली 5-6 वर्षे शेतकरीविरोधी कायदे रद्द करा म्हणून आंदोलन करीत आहोत. आता कुठे केंद्र सरकारने अनिच्छेने व बिचकत बिचकत आवश्यक वस्तू व बाजार समिती कायद्याला हात लावला आहे. करोनाच्या आपदेने त्यांना शेतकरीविरोधी कायद्यांचा विचार करणे भाग पडले आहे. या परिस्थितीचा आपण योग्य वापर केला तर सारा फास निघून जाईल. *गरज आहे आपला आवाज मोठा करण्याची.* शेतकरीविरोधी कायदे रद्द करा म्हणणारे हजारो live व्हायरल झाले तर सरकारवर दबाव येईल. हजारो वर्षांची गुलामी संपवण्याची ही वेळ दवडू नका. तुम्ही स्वतः एक live व्हिडीओ करा व दुसऱ्या एकाला करायला लावा. मला विश्वास आहे की या आंदोलनाचा खोलवर परिणाम होईल.
● अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन, 8411909909
COMMENTS