*कवी-लेखिका रश्मी हेडे यांना कोविड योद्धा पुरस्कार* कोरोना महामारीमुळे देशात २४ मार्च २०२० पासून लॉक डाऊन आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारच नव्हे तर समाजातील सृजनशीलता,निर्मिती क्षमता, क्रियाशीलताही ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या लेखणीद्वारे समाज माध्यमातून, विविध वृत्तपत्रातून सातत्याने कविता,लेख,आत्म कथन लिहून समाजाला धीर ,दिलासा देण्यासाठी कार्यरत असल्याबद्दल कवी,लेखिका रश्मी हेडे यांना कोविड योद्धा पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार त्यांना सत्यवादी ह्यूमन राईट्स,मुंबई आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, नवी दिल्ली ,भारतीय महाक्रांती सेना ,मुंबई या संस्थानी प्रदान केले आहेत. लेखनाबरोबरच रश्मी हेडे यांनी "आरसा" या कॅन्सर ग्रस्ताना उभारी देणाऱ्या लेखक- दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांच्या लघुपट निर्मितीसाठी सहाय्य केले आहे. हे पुरस्कार मिळाल्याबद्दल रश्मी हेडे यांनी वाचकांचे, संबंधित संस्थाचे आभार मानले आहेत. तसेच या कामी साथ देणाऱ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. *अन्य उपक्रम* रश्मी हेडे यांनी लेखणीबरोबरच *कल्पना एकाची व साथ अनेकांची* या उपक्रमात मैत्रिणींच्या व्हाट्सअप्प गृप वर अनेक कार्यक्रम राबवलेत. त्यात सर्व प्रथम *कोविड योद्धा जसे डॉक्टर्स,पोलीस,स्वछता कर्मचारी* त्या सर्वांचे आभार मानून त्यांच्या आरोग्यासाठी विश्व प्रार्थना केली. तसेच आई व आपल्या कुटुंबाबद्दलच्या भावना व्यक्त करायला प्रेरणा दिली. सर्वांना बोलते व लिहिते केले .सर्व पुरुष मंडळींनी आपल्या बायकोबद्दल असणाऱ्या भावना शब्द रुपी प्रकट केल्या. ती एक सोनेरी संधी त्यांना मिळाली. अनेकांना ही कल्पना अतिशय आवडली .यात चाळीस पुरुषांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्यात. त्यामुळे नवरा बायकोच्या नात्याला जणू नव्याने पालवी फुटली . मैत्रीबद्दल लिहिल्यामुळे मैत्रीच्या नात्याला बहर आला. घरात राहून सर्व एकत्र जोडले गेले .तसेच मनोरंजनाचे अनेक उपक्रम जसे की गाण्याच्या भेंड्या देखील खेळल्या गेल्या. उत्साही व आनंदी वातावरण निर्माण झाले .लग्नातिल फोटो शेअर केल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असे विविध उपक्रम १५ दिवस घेण्यात आले. सर्व मैत्रिणींचा उत्तम प्रतिसाद मिळाला . नात्यांमध्ये घर बसल्या एक घट्ट नाळ तयार झाली. रोज कोणता उपक्रम असेल याची सर्वांना उत्कंठा असायची. शेवटी आपल्या नवऱ्या बद्दलच्या भावना लिहून शेवट गोड केला . *"आनंद द्या - आनंद घ्या"* हा एकमेव प्रामाणिक हेतू यामागे होता.लॉक डॉउनमुळे मिळालेल्या वेळेचा खऱ्या अर्थाने सदुपयोग झाला. घरातील जबाबदाऱ्यांबरोबर लिखाण व अनेक सकारात्मक उपक्रम राबवून रश्मी हेडे यांनी यशस्वीपणे तिहेरी भूमिका पेलली.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
*कवी-लेखिका रश्मी हेडे यांना कोविड योद्धा पुरस्कार * कोरोना महामारीमुळे देशात २४ मार्च २०२० पासून लॉक डाऊन आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारच नव्...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशन आणि सहा मान्यताप्राप्त गोदी कामगार महासंघांच्या प्रतिनिधींची मिटिंग १८ मे २०२६ रोजी इंडियन पोर्ट असोसिएशनचे...
-
चाकूर: लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तरुण शिक्षक सुंदरम वांगसकर (२९) यांचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले...
-
विशेष प्रतिनिधी नांदेड: वैद्यकीय क्षेत्रातील मानाची आणि अत्यंत कठीण समजली जाणारी 'NEET' परीक्षा पुन्हा एकदा पेपर फुटीच्या कलंकाने ड...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशन आणि सहा मान्यताप्राप्त गोदी कामगार महासंघांच्या प्रतिनिधींची मिटिंग १८ मे २०२६ रोजी इंडियन पोर्ट असोसिएशनचे...
-
चाकूर: लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तरुण शिक्षक सुंदरम वांगसकर (२९) यांचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले...
-
विशेष प्रतिनिधी नांदेड: वैद्यकीय क्षेत्रातील मानाची आणि अत्यंत कठीण समजली जाणारी 'NEET' परीक्षा पुन्हा एकदा पेपर फुटीच्या कलंकाने ड...
-
छत्रपती संभाजीनगर/लातूर: देशभरात गाजणाऱ्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात आज एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. लातूरमधी...
-
विशेष प्रतिनिधी नांदेड / लातूर: देशभरातील वैद्यकीय शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या लातूर-नांदेडच्या शैक्षणिक प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या NEE...
COMMENTS