*प्रिन्स च्या विद्यार्थिनीची नवोदय साठी निवड*
सेलू. (दि.26) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के आर. आर प्रिस सीबीएससी स्कूल सेलू येथील वर्ग आठवीतील शहरी भागातील दोन विद्यार्थीच निवडले गेले. यामध्ये संस्कृती बाबासाहेब गवळी हिची निवड जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे नववी या वर्गासाठी झाली आहे. नियमित एल के आर आर प्रिन्स सीबीएससी स्कूल येथील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादित करीत असतात. शाळेमध्ये या स्पर्धा परीक्षकांसाठी विशेष वर्ग घेतले जातात व वारंवार शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जाते. इयत्ता आठवीची विद्यार्थिनी संस्कृती बाबासाहेब गवळी ग्रामीण भागातील असून शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या मेहनतीने नवोदयची परीक्षा द्वितीय क्रमांकाने पास झाली आहे. या यशासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, सॅनरो एज्युकेअर प्रा.ली.चे चेअरमन डॉ. आदित्य भैया रोडगे, प्रा. नारायन चौरे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.
*विद्यार्थ्यानी प्रतिक्रिया.*
शाळेमध्ये सर्व शिक्षक खूप चांगले शिकवतात विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करतात स्पर्धा परीक्षेचे पण मार्गदर्शन वेळोवेळी करतात नुसता अभ्यासक्रम न शिकवता त्या अभ्यासक्रमावरील स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करतात माझ्या आठवणीतली शाळा म्हणजे प्रिन्स सीबीएसई स्कूल.
*पालकांची प्रतिक्रिया*
मी बाबासाहेब गवळी ग्रामसेवक मंठा येथील रहिवासी असून दर्जेदार शिक्षण माझ्या पाल्याला मिळावे यासाठी मी आपल्या शाळेची निवड केली केली होती ही निवड सार्थ ठरली कारण आज माझ्या मुलीची संस्कृती गवळी हिची निवड जवाहर नवोदय विद्यालय साठी झाली या यशाचे श्रेय मी पूर्णपणे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे सर व त्यांच्या शाळेतील पूर्ण टीमला देत आहे शाळेत सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध राबवले जातात आधुनिक प्रणालीद्वारे शिक्षण देणारी एकमेव परभणी जिल्ह्यातील संस्था म्हणजेच श्रीराम प्रतिष्ठान.
COMMENTS