शैक्षणिक संस्थांची कार्यालये अशैक्षणिक कामकाजासाठी सुरु* उस्मानाबाद 11 जून ग्लोबल मराठवाडा शैक्षणिक संस्था (विद्यापीठे, महाविद्यालये, शा...
शैक्षणिक संस्थांची कार्यालये अशैक्षणिक कामकाजासाठी सुरु*
उस्मानाबाद 11 जून
ग्लोबल मराठवाडा
शैक्षणिक संस्था (विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा) ची कार्यालये, कर्मचारी यांना सामग्री (e-content) चा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, निकाल घोषित करणे यासह फक्त अशैक्षणिक कामकाजासाठी कार्यालये चालू ठेवण्यास परवानगी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश पारित केले होते. त्या आदेशात दुरुस्ती करुन दुरुस्तीचे आदेश पारित केले आहेत.
COMMENTS