*९८ रक्तदात्यांनी केले रक्तदान...*
नांदेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालय डॉक्टर लेन येथे रक्दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ९८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करून मास्क व सॅनिटायझर वापर करून २१ ला वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शहर उपाध्यक्ष प्रा. जांभरूनकर, नांदेड ग्रामीणच्या महिला अध्यक्षा प्राजंली रावणगावकर, राहूल जाधव, मनबिरसिंघ ग्रंथी यांच्यासह ९८ जणांनी रक्तदान केले.
यावेळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य कल्पनाताई डोंगळीकर, बंटी लांडगे, गणेश तादलापूरकर, पांडुरंग काकडे, डॉ.मुजाहिद खान, कन्हैया कदम व धनंजय सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
COMMENTS