माजलगाव ( प्रतिनिधी) - तालुक्यातील मोठेवाडी येथील भूमिपुत्र व कन्नड येथील डॉ. भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणारे समाजशास्त्राचे प्रा. डॉ. प्रकाश खेत्री यांची कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वेबिनार द्वारे आयोजित बैठकीमध्ये सर्वानुमते प्रा. डॉ.प्रकाश खेत्री, औरंगाबाद विभाग यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत पारखी, नागपूर , सचिव डॉ. हेमंत सोनकांबळे, नांदेड, कार्याध्यक्ष प्रा. सुनील शिंदे, कोल्हापूर, सहसचिव डॉ.आयवान जॉन, मुंबई, कोषाध्यक्ष डॉ. व्यंकटेश खरात, बुलढाणा यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांच्या विचारातून कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषद अस्तित्वात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून समाजशास्त्र विषयाची अध्ययन-अध्यापन, संशोधन गतिमान आणि अद्यावत करणे, समकालीन प्रश्नांची समस्यांची चर्चा घडवून आणणे, दरवर्षी अधिवेशन भरवणे आदी विषयांचे कार्य केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी प्रा. रोनाल्ड लुईस, प्रा. उदय गाडगीळ,प्रा. शिवाजराव होडगे, प्रा. सुवर्णा राजाराम साळवी, प्रा. दिलीप सोनकांबळे, प्रा. अनुराधा राहुल चव्हाण,प्रा. संहिता रविंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. गुणवंतराव काळगापुरे,प्रा. अधिकराव हजारे, प्रा. सुमित पवार, डॉ. प्रविण वैष्णव, प्रा. विनोद राठोड,डॉ. नंदलाल बरडे, प्रा. प्रवीण साबळे , डॉ. विजयकुमार रोडे, प्रा. प्रल्हाद हरकळ,
प्रा. अशोक गेडाम यांची निवड करण्यात आली आहे .
या निवडीबद्दल डॉ. खेत्री यांचे डॉ. भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. ए. के. महाले ,प्राचार्य डॉ.व्ही.एन. भोसले, तिफकार शिवाजी हुसे, प्रा. डॉ. संदीप चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS