ग्लोबल न्यूज सर्व्हिस, नांदेड: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी काहीही संबंध नसताना 'परजीवी' काँग्रेस पक्ष आणि त्यांचे...
ग्लोबल न्यूज सर्व्हिस, नांदेड: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी काहीही संबंध नसताना 'परजीवी' काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते हे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नांदेडमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.दिल्लीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने देशभरात काँग्रेसविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार नांदेड शहरातील नवा मोंढा भागातील काँग्रेस कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत काँग्रेस पक्षाच्या धोरणांचा आणि नेत्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

COMMENTS