माजलगाव (प्रतिनिधी) दि.03 जून, बुधवार रोजी सिद्धीविनायक अर्बन माजलगाव येथे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्यतिथी साहेबांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य ठेवून त्यांच्या प्रतिमेसमोर दोन दिवे लावून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी माजलगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ.अशोक तिडके, रा.स्व.संघ जनकल्याण समिती बीड जिल्हा उपाध्यक्ष जगदीश साखरे, भाजपा माजलगाव तालुका संघटक नामदेव मुळे, बाबासाहेब डाके, सिद्धीविनायक अर्बनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील व सिद्धीविनायक अर्बनचे कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.अशोक तिडके यांनी स्व.मुंडे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला, त्यानंतर भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा सिद्धीविनायक अर्बनचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी बोलताना स्व.मुंडे साहेबांच्या अनेक कार्याला उजाळा देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी शासनाने सांगितलेल्या सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
COMMENTS