- श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वितरण
माजलगाव (प्रतिनिधी)
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयात दिनांक 23, 24 जून रोजी इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास रोकडे व सर्व शिक्षक व्रधं यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शाळा पूर्व तयारी म्हणून शाळा निर्जंतुकीकरण करण्यात आली, पुस्तक घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या पालकांसाठी आणि मुलांसाठी सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळुन विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. दि. 23 जून रोजी दुसरीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले तर दि. 24 जून रोजी तिसरी च्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले आणि दि. 25 जून रोजी चौथीच्या विद्यार्थ्यासाठी पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक अंबादास रोकडे यांनी सांगितले आहे. विनामूल्य पुस्तक वाटपाच्या नियोजनामध्ये एका दिवशी एक वर्ग आणि एका वर्गाच्या असलेल्या आठ तुकड्या प्रत्येक तासाला एक तुकडी बोलावून पुस्तक देण्याचे नियोजन सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत केले आहे. तरी पालकांनी विध्यार्थ्यांना सोबत घेऊन विनामूल्य पुस्तक घेवून जावे असे ही त्यांनी सांगितले आहे.
COMMENTS