माजलगाव मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मास्क चे वाटप
माजलगाव ( प्रतिनिधी ) दि ०३ जुन बुधवार रोजी माजलगाव शहरातील जुना मोंढा येथील गणपती मंदिर मध्ये लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त पंकजाताई मुंडे व खासदार डॉ प्रितम मुंडे यांच्या आवाहनाला साद देऊन सोशल डिस्टिगचे अंतर पाळुन मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन माजलगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके, भाजप तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सरवदे, भाजपचे युवा नेते मनोज फरके इत्यादीच्या हस्ते मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या हस्ते मास्क चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग वगरे, शिंपेटाकळीचे सरपंच रतन कुंडकर, शुक्ल तीर्थ लिमगावचे माजी सरपंच वैजनाथ गायके, सोसायटीचे माजी संचालक भीमराव कुंडकर, गोकुळ पवार, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी दत्ता महाराज, क्षिरसागर बाळु,दिवटे गावडे, चोरे, वगरे, राऊत, कीर्त मुंजा, पांचाळ पोकळे मामा व अनेक मुंडे सैनिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते गोपीनाथ मुंडे अखंड पाणपोईचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष तात्या पांचाळ यांनी केली होती.
COMMENTS