*ऐतिहासिक वारसाने संपन्न श्री क्षेत्र माहूर.*
*"भानुतीर्थ" माहूर येथील प्राचीन कुंड त्याच दिव्यत्व पाहून डोळे आपले दिपतील असे सौन्दर्य.* एवढा मोठा ऐतिहासिक ठेवा आज दुर्लक्षित आहे.श्री निलेश केदार गुरुजी यांच्या विनंती वरून सध्या माननीय तहसीलदार श्री वरणगावकर साहेबांनी कुंडातील गाळ काढणे सुरू केले आहे. श्री निलेश केदार गुरुजींनी मलाही यासंदर्भात तांत्रिक मार्गदर्शन करण्यास सांगितलं, तेंव्हा मी त्यांना कुंड रिचार्ज कसा होईल या विषयी माहिती दिली.
पूर्वी हा कुंड बाराही महिने भरून असायचा,या भागात पिण्याचा पाण्यासाठी तो मुख्य स्रोत होता.
त्या कुंडाजवळ एक तलाव ही होता , त्याचे पाणी जनावरे व घरगुती वापरासाठी वापरत.तो तलाव आता गाळाने पूर्ण भरून गेला आहे,त्यामुळे या कुंडात जे झरे आहेत ते आता आटत चालले आहेत. शासकीय योजना, रेणुका देवी संस्थान अथवा स्वयंसेवी संस्था मार्फत या कुंडाच्या शेजारील या तलावातील गाळ काढला तर , हे कुंड रिचार्ज होऊन 12 ही महिने पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. *एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आपणास लाभला आहे हे आपले भाग्य आहे.आपण जेंव्हा श्री क्षेत्र माहूर तीर्थ येथे दर्शनास जाल तेंव्हा मातृतीर्थ, भानुतीर्थ व इतर कुंडास नक्की भेट द्या, आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासाची प्रचिती नक्की येईन.*
|| *जय जगदंबा माता,जय गुरुदेव दत्त,जय अनुसया माता* ||⛳⛳🚩
*दिपक मोरताळे*
*जलस्वराज्य परिवार,नांदेड.*
9422174647
#JalShakti https://www.facebook.com/groups/629708237885909/permalink/659006411622758/?sfnsn=wiwsp fcwa&extid=KfcFsYtX6P0sIRuK
COMMENTS