दिनांक 05.06.2020
लातुर 54 पैकी 51 निगेटीव्ह 03 पॉझिटीव्ह
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 05.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 20 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पाझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्ती जीवन आशा इमारत नरहर कुरुंदकर मार्ग भाग्य नगर लातूर येथील रहिवासी असून त्यांना ताप, खोकला व दम लागत असून त्यांना शुगरचा आजार आहे. 04 जून रोजी सांगली येथून प्रवास करून आलेले आहेत. दिनांक 04.06.2020 रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती कोरोना विलगीकारण
कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन 02 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 02 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापुर येथील 09 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 09 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. औसा येथील 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
असे लातुर जिल्हयातील एकुण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
जिल्ह्यात आज एकूण 6 रुग्णांना डिस्चार्ज*
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधित 100 रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेले*
लातूर, दि. 5:- आज दिनांक 5 जून 2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकूण सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये निलंगा तालुक्यातील दापका कोविड केअर सेंटर मधून कासारशिरशी चे 5 रुग्ण व शिराढोन चा एक रुग्ण असे एकूण सहा रुग्णांना आयसीएमआर यांच्या नियमावलीप्रमाणे त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना आज रुग्णालय प्रशासनाच्या वतीने डिस्चार्ज देण्यात आला.
त्यामुळे लातूर जिल्ह्यात आज रोजी उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 38 इतकी झाली असून उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 100 इतकी झाली आहे तर आजपर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.
******
COMMENTS