धारूर च्या रुग्णामुळे माजलगाव शहर चिंताग्रस
माजलगाव (प्रतिनिधी)
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे आढळलेला कोरोनाग्रस्त दि.1, 2, 3 व 4 जून रोजी माजलगाव येथील देशपांडे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता. त्यामुळे माजलगाव शहर चिंतेत सापडले आहे. आता आरोग्य प्रशासनाने या हॉस्पिटलमधील डॉक्टर व डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या ईतर रुग्णांचा शोध सुरु केला आहे.
बीडमध्ये ज्याप्रमाणे एक कोरोनाग्रस्त हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता, तसाच काहीसा माजलगावातही प्रकार घडलेला आहे. आंबेवडगावच्या रुग्णास रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता, त्यामुळे तो देशपांडे यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमीट होता. दि.4 जून रोजी त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशी माहिती धारुरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे व माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
COMMENTS