*************************
श्री संत वामनभाऊ महाराज यांनी १२५ वर्षापुर्वी प्रारंभीत केलेला पायी दिंडी सोहळा आहे. आषाढी एकादशीनिमित्त क्षेत्र गहिनीनाथगड ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणारा गहिनीनाथ गडाची संत वामनभाऊ पायी दिंडी सोहळा कोरोना महामारीमुळे यावरूषी रद्द झाला आहे परंतु संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी , जगतगुरु तुकाराम महाराज देहु यांच्या पादुका हेलिकॉप्टरमधून पंढरपूरला जात आहेत.त्या धर्तीवर शासनाचे नियम पाळत गहिनीनाथ गडावरून संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून घेऊन जाण्याचा निर्णय झाला आहे.या पादुका खंड होऊ नये म्हणुन मठाधिपती महंत विठ्ठल महाराज हे हेलिकाॕप्टरमधुन घेऊन जाणार आहेत. महंत विठ्ठल महाराज यांच्या समवेत माजी आ.भीमराव धोंडे व पुजा-यासह जाणार आहेत.दि.३० जून रोजी दुपारी हा पादुका प्रस्थान सोहळा होणार आहे.
COMMENTS