माजलगाव (प्रतिनिधी)
कोरोना व्हायरस ने देशात प्रवेश केल्यामुळे केंद्र व राज्य सराकरने लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे आखा देश लॉक डाऊन झाला या लॉक डाऊन मध्ये बेअर-बार,वाईन शॉप, देशी दुकाने बंद झाल्यामुळे मात्र तळीरामाची खूपच अडचण झाली होती आज दि.26 मे रोजी वाईन शॉप उघडाय च्या अगोदरच वाईन घेण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेऊन तळीरामाच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.
जिल्हाधिकारी रेखावर यांनी जिल्ह्यात वाईन विक्री करणाऱ्या वाईन शॉप दुकानदाराला नेमाने पालन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत दुकाना समोर जास्त गर्दी होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्स ठेऊन पोलीस बंदोबस्तात वाईन विक्री करत आहेत.
वाईन घेण्यासाठी मला कोणी बघन म्हणून काही लोकांना तर वाईन घेण्यासाठी माणसं रांगेत उभे केले आहेत. दारू पिता नी कोणी बघत नाही का ? रांगेत उभे राहिल्यावरच येणारे जाणारे बघतील म्हणून वाईन घेण्यासाठी तळीरामाच्या माणसं रांगेत उभे केले आहेत.
COMMENTS