दिंद्रुड प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावापासुन जनमानसाला वाचवण्यासाठी आटापिटा करणार्या कोरोनायोद्यांना तल्लेतुताई सोलार प्रकल्पाकडुन कोरोना बचाव किटचे वाटप मंगळवारी करण्यात आले.
कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर दिंद्रुड पोलीस सेवा देतांना जिवाची तमा न करता रात्रंदिवस जनमानसात सुरक्षा पुरवत आहेत. कसलिही आत्मसुरक्षाची काळजी न करता कोरोनाचा प्रादुर्भाव दिंद्रुड परिसरात कसा रोखायचा या ध्यासाने सर्व पोलिस बांधव कर्तव्य निभावत आहेत. याचीच जान ठेवुन धारुर तालुक्यातील चाटगांव येथिल तल्लेतुताई सोलार प्रकल्पाकडुन सदर पोलिस कर्मचारी व कोरोना युध्दातील लढवय्यांना कोरोना बचाव किटचे वाटप मंगळवारी दिंद्रुड पोलीस स्टेशन चे सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले. मास्क, सॅनिटाइजर, हॅण्ड ग्लोज आदी वस्तू या किट मध्ये होत्या. तल्लेतुताई सोलार प्रकल्पाचे अधिकारी राधेय यार्डीकर , संतोष कुमार नल्ला, सामाजिक कार्यकर्ते संतोष स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. पोलिस कर्मचारी, पत्रकार व दिंद्रुड ग्रामपंचायत कर्मचारी यांना हे किट वाटप करण्यात आले.
COMMENTS