माय बाप जनता, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, मित्र परिवार, नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर्स व जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी देव-देवतांना प्रार्थना, नवस करून, जिजा आजारातुन यांच्या आशीर्वादा मुळेच बरे झाले - रोहित देशमुख
माजलगाव (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या सेवेमध्ये 24 तास तत्पर असणाऱ्या जिजांनी आपल्या तब्येतीकडे कधी लक्षच दिले नाही, उठलं कि अगोदर लोकांच्या सेवेत तत्पर, या धावपळीमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत गेला, पहाडासारखे दणकट असणाऱ्या जिजाची तब्येत बिघडत गेली, परस्थिती खूपच हाताच्या बाहेर गेली होती, एक मोठं ऑपरेशन करावं लागलं व जवळपास 6 महिने डॉ.च्या निगराणी खाली ठेवलं,या वेळी जिजा आजारपणातुन बरे व्हावेत यासाठी बीड जिल्हातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील व विशेषत:हा माजलगाव मतदारसंघातील माय बाप जनता, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, मित्र परिवार, नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर्स व जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी देव-देवतांना प्रार्थना, नवस करून, जिजा आजारातुन लवकर बरे व्हावेत यासाठी साकडे घातले आणि आज जिजा आजारतुन आपल्याच आशीर्वादाने बरे होत आहेत. आज ऑपरेशनला 6 महिने पूर्ण होत आहेत. कातड्याचे जोडे करून घातले तरी माय-बाप जनतेच्या आशीर्वादाची फेड कधीच करू शकणार नाही अशी भावना माजी आमदार आर टी देशमुख यांचे सुपुत्र रोहित देशमुख यांनी व्यक्त केली
COMMENTS