?
जिल्ह्यात वाळू टेंडर नसताना चोरटी वाळू वाहतूक होते काशी ?
माजलगाव/भास्कर गिरी
बीड जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनात गर्क असताना माजलगाव तालुक्यातील मोगरा,शु.तीर्थ लिंबगाव व गोदा काठावरील गावामधून राजरोसपणे चोरटी वाळू वाहतूक करणारे हायवा रात्री 2 ते 3 च्या सुमारास सुसाट धावत असून सुद्दा त्यावर माजलगाव महसूल प्रशासनातील अधिकारी कारवाई करण्यास का धजावत नाही ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून नेमकं वाळू भरून देणाऱ्या जेसीबी व वाळू वाहतूक करणारे त्या हायवा आणि लोकेशन देणारी ती जीप कोणाची ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थीत होत आहे.
तालुक्यातील सोंनाथडी हे गाव गोदावरी काठच्या तीरावर आहे त्या ठिकाणी वाळू भरमसाठ असताना वाळू माफियांना वाळूचा एक कंन सध्या बाहेर काढता येत नाही त्या ठिकाणचे नागरिक त्या बाबतीत सतर्क राहतात सोंनाथडी गावच्या नागरिका सारखे बाकीच्या ग्रामपंचायतने गोदावरीचे रक्षण केल्यास वाळू चोर माफियांना जेसीबी,हायवा विकल्या शिवाय पर्याय राहणार नाही.जिल्ह्यात वाळूचे टेंडर कुठेच चालू नाही हे प्रशासनाला माहीत असताना ही महसूल व पोलीस प्रशासन काय करते ? अशी शंका येत आहे
-------------------------------
बीड जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याने जिल्हा प्रशासन सध्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता याचं काहींना काहीच घेणं नाही अशा लोकांनी तर चक्क वाळू माफिया सोबत राहून जीपच्या साह्याने महसूलचे लोकेशन देत असल्याची चर्चा सध्या परीसरात होत आहे.
COMMENTS