देवनी ( जि.लातूर) ता.प्रतिनीधी राजेंद्र हाल्लाळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 20.05.2020 रोजी एकुण 246 व्...
देवनी ( जि.लातूर) ता.प्रतिनीधी राजेंद्र हाल्लाळे
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 20.05.2020 रोजी एकुण 246 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन (त्यामध्ये पॉझिटीव्ह व्यक्तींवर उपचार करतान संपर्कात आलेले डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ व वर्ग ४ कर्मचारी यांचा समावेश आहे ) ही अत्यंत दिलासादायक बाब आहे व एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे उर्वरीत 2 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 12 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. निलंगा येथुन 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले हाते त्यापैकी 11 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत. देवणी 12, जळकोट 5, रेणापूर 6, स्त्री रुग्णालय लातूर येथील 4 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. लातुर जिल्हयातील असे एकुण 96 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 89 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, एक व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे व 5 व्यक्तिचे अहवाल प्रलंबित आहेत.
तसेच बीड जिल्हयातील113 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 90 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 6 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असून 13 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 33 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 4 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत असे एकुण आज 246 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 212 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व 7 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व 22 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली
COMMENTS