मुंबई प्रतिनिधी
मुख्यमुंबई उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, अदिती तटकरे, उपस्थित.
मा. मुख्यमंत्री यांचे मुद्दे :
खरीप हंगामासाठी चांगल्या सुचना आपल्याकडून आल्या. या सूचनांची दखल घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश मी कृषी व सहकार विभागाला देत आहे
आपल्या सरकारला ६ महिने पूर्ण होत आहेत. एक चांगला अर्थसंकल्प मांडला आणि कोरोनाचा वेढा आपल्याला पडला. आज देशाचीच अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.
अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन महाराष्ट्र पुढील काळात काय करू शकतो ते पाहण्याची गरज आहे.
कोरोना नंतर जग बदलणार आहे, अर्थातच त्यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे
दर्जेदार पिक घेऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात कशी होईल हेही आपण पहिले पाहिजे
पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
*सहकार विभागाचे सादरीकरण*
मार्च 2020 पर्यंत महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे 60 टक्के काम पुर्ण. १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये वर्ग
खरीप हंगामात ४४ हजार २५ कोटी रुपये पीक कर्जपुरवठ्याचा लक्षांक ठेवले आहे.
ज्या शेतकऱ्यांना अद्याप महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ दिलेला नाही त्यांना जिल्हा बँकांनी थकबाकीदार म्हणून गृहीत न धरता नवीन पीककर्ज द्यावे.
*पणन विभाग सादरीकरण*
राज्यात ४१० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. आतापर्यंत ३४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस १५ ते २० जून पर्यंतखरेदी केला जाईल. १६३ कापूस खरेदी केंद्र कार्यरत. दररोज २ लाख क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ९८ हजार ९३३ शेतकऱ्यांकडून ९ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे.
राज्यात ज्वारी, मका, खरेदीसाठी ७५ केंद्र सुरू आहेत. त्यात २९ जिल्ह्यांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीसाठी २९३ खरेदी केंद्र असून आतापर्यंत १ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
*कृषि क्षेत्र : दृष्टिक्षेप*
भौगोलिक क्षेत्र : ३०७ लाख हेक्टर
लागवडीलायक क्षेत्र :१७४ लाख हेक्टर
*लागवडीखालील क्षेत्र*: खरीप : १४९.७ लाख हेक्टर ;
रब्बी : ५७ लाख हेक्टर
कोरडवाहू क्षेत्र -८१ टक्के
एकूण शेतकरी संख्या – १.५२ कोटी; लहान : - २८.४० टक्के, सीमांत : - ५१.१० टक्के
सरासरी पर्जन्यमान : ११९८ मीमी
प्रमुख पिके : खरीप : भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर , कापूस, सोयाबीन, ऊस
रब्बी : ज्वारी, गहू, हरभरा
राज्यात २०१९ मध्ये सरासरी पर्जन्यमान ११२.६ टक्के
हवामान विभागाने २०२० चा नैऋत्य मौसमी पाऊस सरासरी इतका ९६ ते १०४ टक्के (सामान्य) असेल असा अंदाज वर्तवीलेला आहे. साधारण ९ जून पासून राज्यात पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज असून मुंबईत १० जूनपासून पाऊस पडेल.
*खरीप हंगाम २०२० नियोजन*
1 विविध पिकाखालील एकूण क्षेत्र: १४०.११ लाख हेक्टर
2 सोयाबीन व कापसाचे क्षेत्र ८२ लाख हेक्टर
3 बियाणे बदलानुसार एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल
4 खरीप हंगाम २०२० साठी अंदाजित बियाणे उपलब्धता:- १७.५१ लाख क्विंटल (महाबीज-५.०८, राबिनि-०.३१ व खासगी-११.८६ लाख क्विंटल.
5 खरीप हंगाम २०२० (एप्रिल ते सप्टेंबर) करीता एकूण ४० लाख मे.टन खते मंजूर. खरीप २०१९ मध्ये ३३.२७ लाख मे.टन खतांचा वापर.
6 दिनांक १७ मे २०२० पर्यन्त खतांची उपलब्धता : २६.१३ लाख मे.टन, पैकी ७.१५ लाख मे.टन खतांची विक्री
7खरीप २०२० मध्ये सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र: ४० लाख हेक्टर आहे.
एकूण बियाणे गरज: १०.५० लाख क्विंटल.
संभाव्य सोयाबीन बियाणे उपलब्धता: महाबीज – ३.९१ लाख क्विंटल + राबिनि – ०.२२ लाख क्विंटल+खासगी- ७.११ लाख क्विंटल= एकूण ११.२४ लाख क्विंटल
8 राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून ९८ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड. सदर क्षेत्रासाठी १ कोटी ७० लाख बियाणे पाकिटांचे आवश्यकता. कापूस कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन केलेले आहे. त्यामुळे राज्यात कापूस बियाणे पाकीट यांचा तुटवडा भासणार नाही.
9 खत पुरवठा नियोजन- ४०.०० लाख मेट्रीक टनाचे नियोजन
1o राज्यात खतं विक्रेते- ४४ हजार १४५, बियाणे विक्रेते- ३८ हजार ४७९, किटकनाशके विक्रेते- ३५ हजार ८४१ एवढे विक्रेते आहेत.
11 गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने भरारी पथकांची स्थापना: प्रत्येक जिल्हास्तरावर एक याप्रमाणे एकूण ३५ पथके, प्रत्येक उपविभागस्तरावर ९०, तालुकास्तरावर ३५१, राज्यस्तरावर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक स्थापन करण्यात आले आहे.
12 कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यासाठी १७ हजार ११४ शेतकरी गट कार्यरत आहे. ठाणे विभाग -५६७, कोल्हापूर विभाग- १७६६, नाशिक विभाग- १२०१, पुणे विभाग-४४५२, औरंगाबाद विभाग- ९८९, लातूर विभाग- १६६८, अमरावती विभाग- १९४८, नागपुर विभाग- ४५२३ असे शेतकरी गट कार्यरत आहेत.
*योहित ची वाढदिवस आणि बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत*
*जनसेवेचा संस्कार समृद्ध आयुष्याची शिदोरी- मुख्यमंत्री*
मुंबई दि.21: कोरोनाच्या संकटात मदतकार्यासाठी अनेक सहकार्याचे हात पुढे येत आहेत. यामधील एक आणखी एक बालयोद्धा म्हणजे योहित महेंद्र पाटील. २५ मे ला त्याचा वाढदिवस आहे. त्याने १२७१ रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.
योहित ने ९ मे रोजी महाराणा प्रताप जयंती निमित्ताने ऑनलाईन स्पर्धा जिंकली आणि ५५५ रुपयांचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. त्याचबरोबर त्याच्या छोटेखानी बचत बँकेत जमा केलेले (पिगी बँक) आणि वाढदिवसासाठी राखून ठेवलेले ७१६ रुपये अशी मिळून १२७१ रुपयांची रक्कम त्यांनी कोरोना विषाणुविरुद्ध लढतांना मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. योहितचे वडिल श्री. महेंद्र पाटील हे सैन्यदलात कार्यरत आहेत.
▶️जनसेवेचा संस्कार समृद्ध आयुष्याची शिदोरी- मुख्यमंत्री*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी योहितला तसेच त्याचे वडिल महेंद्र पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. वडिलांच्या देशसेवेप्रमाणे जनसेवेचा हा संस्कार योहितच्या संपूर्ण आयुष्याची समृद्ध शिदोरी असेल आणि त्यातूनच त्याच्या उज्ज्वल भवितव्याची वाटचाल सुकर होणार आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
*सढळ हाताने मदत करा*
ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा करावयाची आहे अशासांठी माहिती खालीलप्रमाणे आहे. या खात्यात सढळ हाताने मदत जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
*स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख् रुपयांची रक्कम*
*रेल्वेभाड्यापोटी दिली एकूण ६७ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम*
- मुंबई दिनांक 21: स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती, त्यानंतर त्यांच्या रेल्वे भाड्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल असे म्हटले होते व पहिल्या टप्प्यात राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ०७० रुपये जमा केले होते. आता सहा जिल्ह्यांना अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख ०८ हजार ४२० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. म्हणजेच स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत. हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
*सहा जिल्ह्यांना वाढीव निधी*
ज्या सहा जिल्ह्यांना वाढीव निधी देण्यात आला आहे ते जिल्हे असे:- मुंबई उपनगर जिल्हा- १० कोटी, अहमदनगर- ३० लाख, सातारा- ४९ लाख ६८ हजार ४२०, सांगली- ४४ लाख ४० हजार, सोलापूर- २० लाख, कोल्हापूर- १ कोटी.
.....
COMMENTS