दिवाळी सणानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सुट्ट्या जाहीर केल्या ...
दिवाळी सणानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आणि ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज या सार्वजनिक सुट्ट्या आहेत. याशिवाय ९, १२, १३ व १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त अतिरिक्त सुट्ट्या देण्यात आल्या आहेत
या अतिरिक्त सुट्ट्यांपैकी १३ व १४ नोव्हेंबरच्या सुट्ट्यांची भरपाई करण्यासाठी अनुक्रमे २१ नोव्हेंबर (तिसरा शनिवार) आणि ५ डिसेंबर (पहिला शनिवार) रोजी विद्यापीठाचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. तसेच ९ व १२ नोव्हेंबरच्या सुट्ट्यांची भरपाई कोणत्या दिवशी करायची, याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक व प्रशासकीय कामे प्रलंबित राहू नयेत, तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागप्रमुख व संकुल संचालकांनी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.
या सुट्ट्या विद्यापीठ मुख्य परिसर, लातूर व परभणी उपपरिसर, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली तसेच कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे लागू राहतील.

COMMENTS