भंडारवाडीत शेतकरी संघटनेची शाखा स्थापन!

  'लोकसहभागातून जलसमृद्ध किनवट' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विहिरींसाठी ३२ शेतकऱ्यांचे अर्ज दाखल दि. 27 नोव्हेंबर  भंडारवाडी (ता....

 



'लोकसहभागातून जलसमृद्ध किनवट' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विहिरींसाठी ३२ शेतकऱ्यांचे अर्ज दाखल


दि. 27 नोव्हेंबर 

भंडारवाडी (ता. किनवट) : किनवट तालुक्यातील शेतीचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या 'लोकसहभागातून जलसमृद्ध किनवट' अभियानाला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच अभियानाला बळ देत मौजे भंडारवाडी येथे शेतकरी संघटनेची गाव शाखा स्थापन करण्यात आली असून, विहिरींच्या निर्मितीसाठी तब्बल ३२ शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.


मौजे भंडारवाडी येथील हनुमान मंदिरात शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच शेतकरी संघटनेची गाव शाखा स्थापन करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


शेतकरी संघटनेची भंडारवाडी शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :


- शाखाध्यक्ष : अशोक दिलीपराव केंद्रे

- उपाध्यक्ष : संतोष कोंडीबा गोपेवाड

- सचिव : विजय दिगंबर केंद्रे


सदस्य : रामचंद्र माधव केंद्रे, ज्ञानेश्वर दादाराव देवर, परशुराम संभाजी केंद्रे, विठ्ठल संभाजी केंद्रे, माधव लक्ष्मण गुट्टे, श्रीरंग रामराव केंद्रे, सुरेश लक्ष्मण कुठे, विष्णू गोविंद मुंडे, नागनाथ लक्ष्मण कुठे, संभाजी विठ्ठल गुट्टे, बालाजी केंद्रे, प्रथमेश बाळकृष्ण केंद्रे, किरण सुरेश गुट्टे, पांडुरंग मारुती केंद्रे, दत्ता रामराव केंद्रे आणि नागनाथ दिगंबर केंद्रे.


३२ शेतकऱ्यांचा पुढाकार; सिंचनासाठी सामूहिक प्रयत्नांना बळ


किनवट तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. अनियमित पाऊस आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतीला शाश्वत सिंचनाची जोड मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत अपेक्षित बदल घडवून आणणे कठीण आहे.


हीच गरज लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी 'लोकसहभागातून जलसमृद्ध किनवट' अभियानाची संकल्पना पुढे आणली आहे. या अभियानांतर्गत तालुक्यात २००० विहिरी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासकीय योजनांचा समन्वय, लोकसहभाग आणि शेतकऱ्यांचा सक्रिय पुढाकार यांच्या माध्यमातून सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा या अभियानाचा प्रयत्न आहे.


भंडारवाडी येथील ३२ शेतकऱ्यांनी विहिरींसाठी अर्ज दाखल करून या अभियानात सहभाग नोंदविला आहे. गावपातळीवर शेतकरी संघटनेची शाखा स्थापन झाल्यामुळे या अभियानाच्या पुढील कामकाजालाही संघटित स्वरूप मिळणार आहे.


'शेतकऱ्यांची संघटित शक्ती हीच जलसमृद्ध किनवटची खरी ताकद!' – रमेश कदम पाटील


यावेळी बोलताना रमेश कदम पाटील म्हणाले की, किनवट तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिंचन सुविधा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतीला सिंचनाशिवाय पर्याय नाही. तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून सामूहिक प्रयत्न उभे करणे गरजेचे आहे.


'लोकसहभागातून जलसमृद्ध किनवट' अभियानाला गावोगावी मिळणारा प्रतिसाद हा शेतकऱ्यांच्या संघटित शक्तीचा पुरावा आहे. भंडारवाडी येथील ३२ शेतकऱ्यांनी विहिरींसाठी अर्ज दाखल करणे ही अभियानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


या बैठकीस अंबादास आमले यांच्यासह भंडारवाडी येथील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.


'विहीर एक – फायदे अनेक' या संकल्पनेतून प्रत्येक गावात जलसमृद्धीचा विचार रुजवायचा आणि लोकसहभागातून किनवटच्या शेतीला शाश्वत सिंचनाची जोड द्यायची, हा शेतकरी संघटनेचा निर्धार आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group