नांदेड :(दि. २८ नोव्हेंबर २०२६)
श्रीनिकेतन हायस्कूल, दीपक नगर तरोडा (बु.) येथे संविधान दिनानिमित्त दि. २६ नोव्हेंबर रोजीयशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोगल ए. के. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. मारुती भोसले हे उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. "लहान-लहान गोष्टीतून मुलांनी जागरूक होऊन, नियमांचे आत्मसात करण्याची सवय लावून संविधानाला बळकटी द्यावी" असे विचार डॉ. अजय गव्हाणे यांनी मांडले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना खिळवून ठेवून त्यांच्यावर संविधान मूल्यांचे संस्कार केले.
कार्यक्रमात मार्गदर्शक प्रा. मारोती भोसले यांनीही मुलांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सौ. धोत्रेकर के. एन. यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सूर्यवंशी एन. जी. यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री. मानेगावकर एस. एन. यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. सोनकांबळे के. डी., काशिनाथ इसादकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS