'मज्जाच मज्जा' हा एकनाथ आव्हाड यांचा पाचवा बालकवितासंग्रह अ. भा. सानेगुरुजी कथामालेच्या डोंबिवली शाखेने दि. ९ ऑक्टोबर २०११ रोजी प्रक...
'मज्जाच मज्जा' हा एकनाथ आव्हाड यांचा पाचवा बालकवितासंग्रह अ. भा. सानेगुरुजी कथामालेच्या डोंबिवली शाखेने दि. ९ ऑक्टोबर २०११ रोजी प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात एकूण २५ बहारदार कविता आहेत. ह्या संग्रहाला ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचा प्रस्तावनारूपी आशीर्वाद लाभला आहे. त्यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे एकनाथ आव्हाड यांची कविता नात्यागोत्यातील, तसेच सभोवतालच्या माणसांचे आणि पशुपक्ष्यांचे प्रत्ययकारी चित्रण करते. ही कविता बालवाचकांना स्वप्नसृष्टीत घेऊन जाते. एकनाथ आव्हाड यांनी उभी केलेली प्राणीसृष्टी अतिशय अद्भुत आणि मजेशीर आहे. ही कविता बालवाचकांना निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी देते. बालकुमारांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचे कामही ही कविता करते.
'मजेशीर भांडण' ह्या कवितेत इटुकली मुंगी आणि अवाढव्य हत्तीचे भांडण झाले आहे. एक मुंगी दुसर्या मुंगीला, हत्तीला पाण्यात बुडविण्याचा सल्ला देते. मुंगी केवढी आणि हत्ती केवढा! मुंगीचा हा सल्ला ऐकून बालवाचकांच्या गालावर हसू न उमलले तरच नवल!
'गोष्ट संपल्यावर जादू घडे
पाखरांना घेऊन झाड उंच उडे'
ह्या ओळीतली कल्पनारम्यता आणि अद्भुतरम्यता खरोखरच कौतुकास्पद आहे.
ह्या कवितेत आपल्याला गमजा करणारा एक विदूषक भेटतो. विदूषक हाच सर्कशीचा खरा प्राण आहे, असे कवीला वाटते.
मुलांच्या गुणांचे सगळ्यांनाच कौतुक असते. शाळेत छान भाषण केले, की त्या विद्यार्थ्याला खूप मान मिळतो. पूर्वी ज्याला लोक 'वाया गेला' म्हणायचे, त्यालाच लोक डोक्यावर घेऊन नाचतात. ही सगळी पहिल्या नंबरची जादू आहे. ही कविता बालवाचकांना पहिला नंबर पटकावण्याची प्रेरणा देऊन जाते.
ह्या कवितेत आपल्याला गणू नावाचा एक गुणी मुलगा भेटतो. तो सगळ्या विषयांत हुशार आहे. 'गाणारे प्राणी' ही तर निसर्गातली दुर्मीळ गोष्ट आहे, पण बालसाहित्यात असे काहीही घडू शकते. ह्या कवितेतला हत्ती गणपतीची आरती म्हणतो. जिराफ छान भावगीत म्हणतो. माकड वीरश्रीयुक्त पोवाडा म्हणते. इटुकला ससा मजेदार बालगीत गातो आणि चतुर कोल्हा भक्तिगीत गातो. हे असे गाणी गाणारे प्राणी म्हणजे सगळी मज्जाच मज्जा आहे!
एक बी मातीत रुजतं आणि त्याला अंकुर फुटतो, ही एक नैसर्गिक घटना आहे. त्यावर कवीने मानवी गुणाचा आरोप केला आहे :
'बी ने आतून हाक दिली
मातीनं दारं खुली केली'.
इतकी ही कविता तरल आणि चित्रदर्शी आहे.
आजी आणि आजोबा हे बच्चे कंपनीसाठी नेहमीच अपील कोर्टासारखे असतात. तिथे नातवंडांना सगळे गुन्हे माफ असतात. म्हणूनच ह्या कवितेतला एक मुलगा आपल्या आजीविषयी म्हणतो :
'डोक्यावरी माझ्या जेव्हा फिरे तिचा हात
सुरकुतलेल्या हातांमध्ये माया किती दाट!'
एकनाथ आव्हाड यांच्या कवितेतील आई ही नेहमीच सद्गुणांची पाठराखण करते. ही आई संकटात खंबीरपणे बाळाच्या पाठीशी उभी राहते. आईचा गौरव करताना मातृभक्त कवी लिहितात :
'मायेचा सागर, माझी ही आई
माझ्यासाठी तीच आहे विठाई'
कवीला आपली आई ही पंढरीची विठाई वाटते, यासारखी कृतज्ञता नाही.
ग्लोबल वॉर्मिंगच्या ह्या काळात पाऊस संपावर जाण्याचा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. हल्ली अधूनमधून पाऊस संपावर जातोच. पावसाअभावी सृष्टीचे अतोनात हाल होतात. कवीने ह्या कवितेत अतिवृष्टी आणि अनावृष्टीचे प्रत्ययकारी चित्रण केले आहे.
'माझी वही' ही एकनाथ आव्हाड यांची एक गाजलेली कविता आहे. अनेक कार्यक्रमांतून ते आपली ही कविता सादर करत असतात.
'शेवटी घेतली आईची सही
सजून गेली माझी वही'
हा ह्या कवितेचा समारोप अतिशय भावस्पर्शी झाला आहे! आईच्या सहीशिवाय वहीला परिपूर्णता नाही, हा ह्या कवितेचा भावार्थ!
शेवटच्या ओळींमुळे ही कविता कमालीची उंची गाठते.
इटुकली मुंगी आणि अवाढव्य हत्तीचे भांडण,
हत्तीला पाण्यात बुडविण्याचा विचार करणारी धाडसी मुंगी, पाखरांना सोबत घेऊन उडणारे चमत्कारी झाड, सर्कशीत टिवल्याबावल्या करून प्रेक्षकांची मने जिंकणारा विदूषक, शिक्षक झालेला भित्रा ससा, शेतात बोलणारं कणीस, वेगवेगळी गाणी गाणारे जंगली प्राणी, लबाड लांडगा आणि जंगलचा राजा सिंह यांच्यातील मजेदार संवाद, एका मुलाने फुलपाखरू होऊन केलेली निसर्गातली आनंददायी सफर, जादूगाराने केलेली जादू म्हणजे ही सगळी मज्जाच मज्जा आहे!
एका छोट्या संग्रहात इतके सगळे आनंदानुभव देऊन एकनाथ आव्हाड यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. केवळ ४० पृष्ठांमध्ये इतक्या सगळ्या गमतीजमती दाखवून कवी एकनाथ आव्हाड यांनी फुलामुलांची आनंदाची बाग फुलवली आहे. 'छंद देई आनंद' ह्या बालकवितासंग्रहासाठी एकनाथ आव्हाड यांना पुढे २०२३चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्याचा इसार आपल्याला ह्या संग्रहात सापडतो.
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

- 'मज्जाच मज्जा' (बालकवितासंग्रह)
- कवी : एकनाथ आव्हाड
- प्रकाशक : अ. भा. सानेगुरुजी कथामाला, डोंबिवली.
- पृष्ठे : ४० किंमत : रु ५
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS