श्रीक्षेत्र माहूर
इलियास बावाणी माहूर
माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचे दर्शन सहज सुलभरीत्या आनंदात व्हावे यासाठी मंदिर प्रशासन विश्वस्त समिती कडून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी बिनधास्तपणे आनंदात दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त समिती सदस्य मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी यांचे सह विश्वस्त समितीकडून करण्यात आले आहे
माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दि 11 पासून 20 पर्यंत शारदीय नवरात्र महोत्सव आनंदात साजरा होणार असून गडावर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी महाप्रसाद रांगेतील दर्शन व्यवस्था सुरक्षा व्यवस्था पिण्याचे पाणी सीसीटीव्ही कॅमेरे पायऱ्यावर लाईव्ह दर्शनासाठी मोठी एलईडी यासह इतर सर्व आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी मंदिर प्रशासन विश्वस्त समिती सज्ज झाले आहे
दि 11 रोजी आश्विन शुद्ध प्रतिपदा शके 1948 रोजी सकाळी 7 वाजता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापुजेचे शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होणार असून श्री गणेश पूजन वेदघोषात परंपरेप्रमाणे घटस्थापना त्यानंतर श्री दुर्गा शतचंडी पाठ चतुर्वेद पारायण सुरू करण्यात येणार आहे सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान घटस्थापना होणार असल्याची माहिती मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी यांनी दिली
तसेच घटस्थापनेच्या दिवशी नितीन धुमाळ यांचा कार्यक्रम होणार असून महानंदाताई राठोड यांचा रेणुका मातेच्या गीतावर नृत्याचा कार्यक्रम होणार आहे सोबतच संतोष पंचलिंग शिवाजी शेवाळे यांचाही कार्यक्रम होणार आहे बालकलाकार स्वरदा बोंपीलवार यांचाही कार्यक्रम होणार आहे हा अरव उन्हेकर यांचे सह जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम सुहासिनी क्रिएटिव्ह ग्रुप सादर करणार आहे कल्याणी देशपांडे यांचाही कार्यक्रम होणार असून अनुजा पांडे यांचाही कार्यक्रम होणार आहे सोबतच प्रतिपदा ते दशमी पर्यंत सनई वादन होणार असून बंजारा नृत्यासह भक्ती संगीत तबला नृत्याविष्कार यासह इतरही कार्यक्रम होणार असून प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंतच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ मार्तंड कुलकर्णी हे करणार असून धार्मिक विधी मंत्र व.वे.मु.निलेश केदार गुरुजी करणार आहेत दि 25 रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मातेच्या वैदिक पूजेस प्रारंभ करून महाआरती महाप्रसाद मातेस दुग्ध नैवेद्य व दुग्ध महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त समिती धर्मदाय सह आयुक्त नांदेड श्रीमती हिरा का शेळके सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ बी सरवनन कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार भोंडवे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्नव विनायकराव फांदाडे आशिष जोशी बालाजी जगत दुर्गादास भोपी अरविंद देव पोलीस निरीक्षक देविदास चोपडे एस टी महामंडळ वन विभाग आरोग्य विभाग यांचे सह श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक विजय नामदेवराव राऊत योगेश मधुकरराव साबळे लेखापाल नितीन गेडाम सहाय्यक व्यवस्थापक अरविंद राठोड संगणक चालक सुरक्षा अधिकारी महादेव मुंढे अन्नदान अरुण घोडेकर आकाश वानखेडे सर्व सुरक्षा रक्षक भाविकांच्या पूजा अर्चा व्यवस्थित व्हाव्या दर्शन आनंदात व्हावे यासाठी परिश्रम घेत आहेत
.......................................................
शारदीय नवरात्रोत्सवासाठी लाखो भावीक गडावर येणार आहेत मंदिरामधून दर्शनासाठी न आलेले तसेच घरी असलेल्या भाविकांना लाईव्ह दर्शन करविण्यासाठी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो तसेच येथे असलेल्या दुकानात भाविक खरेदी करून चहा फराळ नाश्ता करतात लहान मुले खेळणे खरेदी करतात परंतु या ठिकाणी कुठल्याही मोबाईल नेटवर्क कंपनीचे नेटवर्क येत नसल्याने ही सर्व कामे होत नाहीत परिणामी भाविकातून प्रचंड नाराजी व्यक्त होत असते त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी येथे नेटवर्क कंपन्यांना सांगून मोबाईल रेंजची व्यवस्था करण्याची मागणी भाविकांतून होत आहे

COMMENTS