शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वे, पंचनामे, केंद्रीय पथकाचे नाटक कशाला, कुंभमेळ्यासाठीचे ३६ हजार कोटी, शक्तीपीठचे ८० हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी वापरा.

*दिल्लीतील आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी मोदी सरकारकडून प्रचंड पोलीस बळाचा वापर, देशात लोकशाही नाही तर हुकूमशाही कारभार.*   मुंबई/जळगाव, दि. १...



*दिल्लीतील आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी मोदी सरकारकडून प्रचंड पोलीस बळाचा वापर, देशात लोकशाही नाही तर हुकूमशाही कारभार.*

 

मुंबई/जळगाव, दि. १० ऑक्टोबर २६


राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणाच जाणवत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने पाहणी दौरे केले, दुष्काळ जाहीर केला पण मदतीचा अजून थांगपत्ता नाही. सर्वे, पंचनामे, केंद्रीय पथकाचे पाहणी दौरे ही नाटकं बंद करून सरकारने तातडीने हेक्टरी १ लाख थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दसऱ्याच्या आधी जमा करावेत, सरसकट कर्जमाफी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, यावर्षीचा दुष्काळ प्रचंड मोठा आहे. राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटावेळी सरकारने भरीव मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांबरोबर शेतमजुरांना आर्थिक सहाय्य व वर्षाला १२ सिलेंडर मोफत द्यावी, जनावरांच्या छावण्या तत्काळ सुरु करा, चारा पाण्याची सोय करा. कर्जवसुलीचा तगादा लावू नये, पण सरकारने फक्त घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी होत नाही, मदत अजून पोहचलेली नाही. सावकारांकडून कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे. सरकारचे कोणी ऐकत नाही असे दिसते. सरकारकडे कुंभमेळ्यासाठी ३६ हजार कोटी रुपये आहेत, गरज नसताना हाती घेतलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत पण शेतकऱ्यांसाठी मात्र नाहीत. या दोन्ही प्रकल्पातील निधी शेतकऱ्यांसाठी वापरा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, त्याकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे. जलजीवन योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे, असेही सपकाळ म्हणाले. 


*दिल्लीतील आंदोलन दडपण्यासाठी हुकूमशाही पद्धत*..

निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात अख्खा देश एकवटला आहे, दररोज आंदोलने होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. दिल्लीतही शांततापूर्ण आंदोलने केली जात असताना आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी दिल्लीत पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांची धरपकड करण्यात आली. रेल्वे बंद केल्या, दिल्ली मेट्रो बंद करण्यात आली. ही अराजकता नाही तर काय आहे. सरकार विरोधी आवाज पोलिस बळाच्या माध्यमातून बंद करणे हा हुकूमशाही कारभार आहे. मतचोरी उघड झाली असून मोदी सरकार घाबरले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा बचाव करण्यासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. भाजपा निवडणूक आयोगाचा वकील आहे का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी विचारला आहे.


*MPSC चे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न*.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, ७० हजार पदांची भरती झाली पाहिजे व एमपीएससी मधील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. पण सरकार मात्र विद्यार्थ्यांवर दडपशाही करत आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे. अशा कारवाया करून सरकार विद्यार्थ्यांचा आवाज बंद करू शकत नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group