अर्ध्या गुंठ्यात अवघे ९१० ग्रॅम सोयाबीन! सायाळ येथे जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग; खरीप उत्पादन घटण्याचे स्पष्ट संकेत — पशुधनासाठी ‘चारा साक्षरता अभियान’

लोहा (वा.) लोहा तालुक्यात यंदा पावसातील प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून उत्पादनातील घट सम...
लोहा (वा.) लोहा तालुक्यात यंदा पावसातील प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून उत्पादनातील घट समोर आली आहे. सायाळ येथे रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात अर्ध्या गुंठ्यात केवळ ९१० ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन मिळाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनाबाबतची चिंता आणखी वाढली आहे.
सायाळ येथील शेतकरी धनराज अर्जुन पवार यांच्या गट क्रमांक ६९ मधील सोयाबीन पिकाची पीक कापणी करण्यात आली. १० बाय ५ मीटर म्हणजेच अर्ध्या गुंठ्याच्या क्षेत्रातील सोयाबीन कापून प्रत्यक्ष वजन करण्यात आले असता ९१० ग्रॅम उत्पादनाची नोंद झाली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत हा प्रयोग करण्यात आला.
पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्यानंतर दीर्घकाळ खंड दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. अनेक भागांत पिके करपली असून, अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. पीक कापणी प्रयोगातूनही या प्रतिकूल परिस्थितीचे चित्र स्पष्ट होत आहे.
पीक घटले; आता चाऱ्याचे आव्हान
खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असतानाच आगामी काळात पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ‘चारा साक्षरता अभियान’ सुरू केले आहे. सायाळ येथे नाला बांधावरील तसेच गाळपेरा क्षेत्राचा उपयोग करून बहुवार्षिक नेपियर चारा लागवड करण्यात आली.
यावेळी उपलब्ध वाळलेल्या व निकृष्ट चाऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे, कडबा कुट्टीचा वापर, हिरव्या चाऱ्यापासून मुरघास निर्मिती व साठवणूक याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले.
निकृष्ट चाऱ्याचेही पौष्टिक आहारात रूपांतर
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वैरण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले. जलस्रोत, नाला बांध व गाळपेरा क्षेत्रांचा उपयोग करून बहुवार्षिक चारा पिकांची लागवड वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पशुसंवर्धन, कृषी, जलसंधारण, महसूल, पंचायत समिती आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. चारा उत्पादन, संवर्धन, मुरघास निर्मिती, कडबा कुट्टी तसेच निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत शेतकरी व पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. पुरी, माजी उपसभापती अण्णासाहेब पवार, गणपत जामगे, मंडळ अधिकारी माधव काकडे, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group