अंबे मात की जय च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन श्रीक्षेत्र माहूर देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ शक्तीपीठ...
अंबे मात की जय च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन
श्रीक्षेत्र माहूर
देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ शक्तीपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे उत्सवाच्या दुसरा दिवशी श्री रेणुका मातेच्या अभिषेकास सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला त्यानंतर विधिवत शृंगार हिरव्या रंगाचे पैठणी महावस्त्र अर्पण केल्यानंतर पूजा करून सुवर्ण अलंकार चढविण्यात आले त्यानंतर घटास विश्वस्त संजय कान्नव यांनी दुसरी माळ बांधली त्यानंतर श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली.
श्री रेणुका मातेच्या उत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या दिवशी पंडित नितीन धुमाळ यांच्या सनई वादनाने दिवसाची सुरुवात झाली 11:30 वाजता महाआरती झाल्यानंतर भगवान श्री परशुराम मंदिराच्या प्रांगणात आलेल्या हजारो भाविकांसाठी अन्नदान प्रमुख अरुण घोडेकर आकाश वानखेडे यांनी महाप्रसाद सुरू केला आलेल्या हजारो भाविकांनी उपवास ठेवला होता त्यासाठी उसळ केळी सफरचंद व इतर फळांची व्यवस्था तर ठिकठिकाणी पिण्यासाठी थंडगार फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांनी मोठ्या आनंदात हिरवी पैठणी अर्पण असलेल्या मनमोहक स्वरूपातील मातेचे मुखदर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसर सोडून जाऊ वाटेना अशा प्रतिक्रिया दिल्या
सकाळी आठ वाजता अभिषेकाने श्री रेणुका देवीच्या विधिवत पूजेस प्रारंभ करण्यात आला. साडेअकरा वाजता घटास माळ दुसरी माळ अर्पण करण्यात आली त्यानंतर श्री रेणुका देवी नैवेद्य तांबुल विडा दाखविण्यात आला. यानंतर श्री रेणुका देवीची महाआरती विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव,अरविंद देव, विनायकराव फ़ांदाडे,आशिष जोशी, अनिल कान्नव, अभिजीत फ़ांदाडे यांनी केली. कुमारीका पूजन करण्यात आले मंदिर परिसरातून छबिना मिरवणूक करण्यात आली यावेळी व्यवस्थापक विजय राऊत सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदशास्त्र संपन्न निलेश केदार गुरुजी यांनी मंत्रोच्चार पूजा केली तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी केले
माहूर गडावर येणाऱ्या वाहनांना व्यवस्थित पार्किंग मध्ये नेणे पार्किंग मध्ये भाविकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे यावर नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे नगरसेवक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनजागरण केले आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश माचेवार यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना औषध गोळ्यांचे वितरण केले उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे सह शेकडो पोलिसांनी पार्किंग शहरातील वाहतूक व्यवस्था फिक्स पॉईंट गडावरील भाविकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांसोबत दक्षता घेत होते
श्री रेणुका देवी संस्थान येथे श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना इथे आल्यानंतर संस्थानने फ्री वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे तसेच देवीचे लाईव्ह दर्शन फोटो व्हिडिओ संकेतस्थळावर पाहता येणार आहेत संकेतस्थळाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS