विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ सदैव तत्पर : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव 'ज्ञानतीर्थ – २०२६...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ सदैव तत्पर : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव 'ज्ञानतीर्थ २०२६' च्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) साने गुरुजी मंचावर या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
मनमोकळेपणाने जगा आणि सदैव आनंदी राहा: अभिनेते भारत गणेशपुरे
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी आपल्या खास विनोदी आणि मिश्कील शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला.
ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा. आपल्या खांद्यावर संपूर्ण जगाचे ओझे आहे, अशा आविर्भावात कधीही वागू नये. या भूतलावर कोणामुळे कोणाचे काहीही अडून राहत नाही. त्यामुळे आपल्यामुळेच सर्व काही चालते किंवा आपल्याशिवाय काहीच होणार नाही, असा गैरसमज मनात बाळगू नका. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, मनमोकळेपणाने जगा, मजा करा आणि सदैव आनंदी राहा.’’
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंडे, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. हनुमंत कंधारकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, संस्थेचे सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, ग्रामीणचे प्राचार्य डॉ. विजय पवार, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्यासह अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य, संयोजन समितीचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साधेपणाने पार पडला उद्घाटन सोहळा
पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झालेल्या या सोहळ्यात तीन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, तर इतरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. चासकर पुढे म्हणाले की, "युवक महोत्सवासारख्या उपक्रमांचे आयोजन करताना अनेकदा नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, कितीही संकटे आली तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या विकासावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी विकासाच्या उपक्रमांमध्ये खंड पडू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्नशील राहिले पाहिजे."
प्रास्ताविक व सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी केले. त्यांनी युवक महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा साळवे आणि प्रा. बालाजी भंडारे यांनी केले, तर युवक महोत्सव 'ज्ञानतीर्थ २०२६' चे संयोजन सचिव डॉ. प्रशांत सुतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव 'ज्ञानतीर्थ – २०२६' चे उत्साहात उद्घाटन
विशेष प्रतिनिधी | नांदेड युवक महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण मंच आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठातून भविष्यात अनेक दिग्गज अभिनेते, अभिनेत्री आणि विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकार घडावेत, हीच अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था सदैव कटिबद्ध असून आम्ही त्यासाठी कायम तत्पर आहोत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव 'ज्ञानतीर्थ २०२६' च्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) साने गुरुजी मंचावर या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

COMMENTS