नांदेड : ऊस दरासाठी कारखानदार व ऊस उत्पादकात संघर्ष सुरु असल्याने ऊस दरावर मार्ग काढण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी सोबत आज मंत्...
नांदेड : ऊस दरासाठी कारखानदार व ऊस उत्पादकात संघर्ष सुरु असल्याने ऊस दरावर मार्ग काढण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी सोबत आज मंत्रालय मुंबई येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून यात मराठवाड्यातील प्रश्न प्राधान्याने मांडणार असल्याचे ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.
राज्यातील ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन शरद जोशी विचार मंच या बॅनरखाली विविध संघटनांनी एकत्रित येऊन दिनांक आठ रोजी साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले होते. साखर आयक्त डॉ. कोलते यांच्यासोबत आंदोलकाच्या झालेल्या चर्चेत अनेक विषय हे मंत्री महोदयाच्या अखत्यारीतील असल्यामुळे संघटनांचे प्रतिनिधी यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सोबत बैठक घेण्याचे ठरले. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदार यांच्यातील संघर्ष टोकाला न जाता चर्चेतून काही सकारात्मक तोडगा निघतो का यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असलेली ऊस टंचाई व साखरेचे वाढलेले दर लक्षात घेता. मागील वर्षी गाळात झालेल्या उसाचे पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल मिळाले पाहिजे व यावर्षी पहिली उचल किमान पाच हजार रुपये मिळावी अशी बहुतांश शेतकरी संघटनांची मागणी आहे. ऊस वजन काटा, रिकव्हरी, मशीनने तोडलेल्या उसाचे कपात करण्यात येणारे पाचटीचे प्रमाण, अवास्तव लावण्यात येणारा तोडणी वाहतूक खर्च , काही वर्षापासून ची आर एस एफ ची बाकी यासह अनेक विषयावर या बैठकीत चर्चा होणार असून मराठवाड्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना वेगवेगळी अमिष दाखवून ऊस नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारखान्यांना उसाची गरज असली की जास्तीचा भाव जाहीर करतात नंतर मात्र एफआरपीच्या वर देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते, तसेच सभासद आणि बिगर सभासद यांना वेगळे दर देण्याची घोषणा काही कारखान्याने केली त्यामुळे यासह अन्य प्रश्नावर या बैठकीत चर्चा होऊन नियमबाह्य गाळप करणाऱ्या कारखान्यावर कारवाही करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले या बैठकीला शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, शिवाजी माने, वैभव कांबळे,सावकार मादनाईक, भगवान काटे,महेश खराडे, रवी मोरे ज्ञानदेव पाटील, जनार्धन पाटील यास प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत

COMMENTS