दुष्काळी परिस्थितीत पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या किनवट व माहूर तालुक्यातील १५ हून अधिक गावातील शेकडो शेतकऱ्यांनी बँकांच्या मनमानीला कंटाळ...
दुष्काळी परिस्थितीत पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या किनवट व माहूर तालुक्यातील १५ हून अधिक गावातील शेकडो शेतकऱ्यांनी बँकांच्या मनमानीला कंटाळून अखेर टोकाचा निर्णय घेतला आहे. दि. 16.10.2026 रोजी शुक्रवार सकाळी 11.00 वाजता मौजे पालाईगुडा ता. माहूर येथील तलावामध्ये सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
आज दि. 5.10.2026 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन नांदेड जिल्हा अग्रणी बँक एसबीआय क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र ग्रामीण बँक व तहसीलदार माहूर किनवट यांना याबाबतचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार एस बी आय शाखा माहूर सारखणी मांडवी व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माहूर वाई बाजार उमरी बाजार या बँका शेतकऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत सिबिल स्कोर खराब आहे सामाईक क्षेत्र आहे भोगवटा वर्ग-२ आहे बचत गटाचे कर्ज आहे खरीप पिकाचे कर्ज नदेता रबी पिक कर्ज घेण्याची जोर जबरदस्ती अशी मनमानी कारणे सांगून खरीप हंगामाचे कर्ज नाकारण्यात आले आहे आता रब्बी हंगामाचे कर्ज नियमानुसार देऊ असे उडवाउडवीचे उत्तर देऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे यामुळे हजारो शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत.
या संदर्भात शेतकऱ्यांनी ना. हेमंत भाऊ पाटील विधान परिषद सदस्य व आ. भीमरावजी केराम आमदार किनवट माहूर यांच्याकडे तक्रार केली होती दोन्ही लोकप्रतिनिधींनी दि 22.9.2026 रोजी बँकांना शिफारस पत्रे देखील दिली आहेत परंतु बँक प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही
आम्हाला न्याय न मिळाल्यास आमच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित बँक व्यवस्थापक व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर गौरी तांडा सतीगुडा चिंचखेड पारडी रूपानाईक तांडा उमरी बाजार सकुनाईक तांडा लोकरवाडी बेगमबाई तांडा आदी गावातील खालील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत रवि उत्तम राठोड
साहेबराव जाधव दिनेश राठोड कवरसिंग राठोड रमेश राठोड अरविंद चव्हाण सरपंच अर्जुन आडे भारतीबाई पवार यशवंत जाधव मिलिंद पडगिलवार यांच्यासह ५२ हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

COMMENTS