दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत*

*स्वारातीम विद्यापीठाचा हिवाळी-२०२६ परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय* राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवा...


*स्वारातीम विद्यापीठाचा हिवाळी-२०२६ परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय*


राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी-२०२६ परीक्षेच्या परीक्षा शुल्कातून सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑक्टोबर, २०२६ रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, विद्यापीठाची संकुले व उपपरिसरे तसेच इतर संबंधित संस्थांमध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या पात्र नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, अशा सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार हिवाळी-२०२६ अर्थात नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या पदवी, पदविका तसेच पदव्युत्तर, व्यावसायिक व अव्यावसायिक नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाने निर्धारित केलेल्या नमुन्यात महाविद्यालयांनी सादर करणे आवश्यक आहे.

या सवलतीसाठी विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यातील रहिवासी असल्याचा पुरावा तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्याने इतर कोणत्याही शासकीय शैक्षणिक सवलतीतून परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती घेतलेली नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची महाविद्यालयीन स्तरावर छाननी व पडताळणी करण्यात येणार असून, पात्र विद्यार्थ्यांनाच परीक्षा शुल्क माफीची सवलत मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी विहित हमीपत्रही सादर करणे आवश्यक आहे.

दरम्यान, हिवाळी-२०२६ परीक्षेचे परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली असून, संबंधित परीक्षा अर्ज १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर महाविद्यालयनिहाय सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा अर्ज व ऑनलाइन शुल्कासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी या परीक्षा शुल्क सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

---------------------

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group