नांदेड: समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत नांदेड शहरात उभारल्या जाणाऱ्या वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट पुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत...
नांदेड: समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत नांदेड शहरात उभारल्या जाणाऱ्या वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट पुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. शहराच्या भविष्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाचे काम सुरू असताना नागरिक व वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली.बैठकीतील प्रमुख निर्णय व सूचना:
वाहतूक व सुरक्षा व्यवस्था: काम सुरू असताना पर्यायी मार्ग निश्चित करणे, अपघात टाळण्यासाठी बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक लावणे आणि रात्रीच्या वेळी चोख प्रकाश व्यवस्था ठेवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या
धूळ नियंत्रण: बांधकामामुळे होणाऱ्या धुळीचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले
विशेष समन्वय समिती: काम सुरळीत व्हावे यासाठी महापालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक, पोलीस प्रशासन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची 'समन्वय समिती' स्थापन करण्याचा निर्णय झाला.
पीपीटी सादरीकरण व पाहणी: पुढील ८ दिवसांत प्रकल्पाचे पीपीटीद्वारे सादरीकरण सादर करावे आणि त्यानंतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन संयुक्त पाहणी करावी, असे निर्देश देण्यात आले.या बैठकीस उपमहापौर दिपकसिंह रावत, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधु, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे, कंत्राटदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, विविध गटनेते, नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. एमएसआरडीसीने लोकप्रतिनिधींच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून काम वेळेत व सुरक्षितपणे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

COMMENTS