प्राथमिक शिक्षक पदोन्नतीत याचिकाकर्त्यांना अखेर दिलासा

नांदेड, दि. २१ - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खं...

नांदेड, दि. २१ - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्र. १४६८७/२०२५ व इतर याचिकांवर दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निर्णयानंतर नांदेड जिल्हा परिषदेने TET/CTET पात्र २८ याचिकाकर्त्या शिक्षकांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नतीसाठीची यादी प्राथमिक शिक्षण विभागाकडून दर्शनी भागात डकविण्यात आली आहे.शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या पत्रानुसार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पदस्थापना आदेश देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयीन लढा काय होता?
शासन निर्णय दि. ०१.०८.२०१९ नुसार TET/CTET पात्रतेमुळे अनेक वरिष्ठ शिक्षकांना पदोन्नती नाकारण्यात आली होती. याविरोधात डॉ. शिवाजी कऱ्हाळे, बालाजी, निळकंठ मरशिवणे, यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होऊन न्यायालयाने दि. ०१.०९.२०२५ या दिनांकापासून TET/CTET पात्र याचिकाकर्त्यांना पदोन्नतीचा लाभ द्यावा, असा आदेश दिला होता. त्यानंतरही जिल्हा परिषदेने अंमलबजावणी न केल्याने शिक्षकांनी अवमान याचिका क्र. २७५/२०२६ दाखल केली होती. दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दुपारी २.३० वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते.
२८ जणांना लाभ, ३ जण अपात्र
जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या यादीत - विस्तार अधिकारी वर्ग-३ श्रेणी-२ ची १४ पदे भरण्यात येणार असून यात 1. ढवळे गंगाधर सूर्यकांत, मरकंटे ज्ञानेश्वर यादवराव, सोनटक्के सदाशिव माधवराव, घोनशेट्टे बालाजी वैजनाथ, मरशिवणे निळकंठ आनंदराव, निंभोरकर दीपक पुंडलिकराव, पवार दत्ता सदाशिव, मुंगले नंदकिशोर सुभाषराव, निलकंठवार योगेश विष्णू, कराळे शिवाजी रामराव, दुगाणे नितीन गंगाराम, सलगरे शिवाजी व्यंकटराव, ढवळे राहुल रावसाहेब, गुंडेराव सुमेद चापाजी यांचा समावेश आहे. तसेच विस्तार अधिकारी वर्ग-३ श्रेणी-३ ची ९ पदे भरण्यात येणार असून केंद्रे बालाजी सखाहारी, सातपुते पांडुरंग दत्ता, बोधने कैलास उमाकांतअप्पा, उगिले प्रियंका सोपानराव, पुंड गजानन नारायणराव, मठपती संतोष मन्मथप्पा, कापसे सुशील मारोतीराव,अवधूतवाड धनराज अंतेश्वर, चव्हाण रमेश हिरामण यांचा समावेश आहे तर ५ उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदांसाठी तानुलवार गंगेश भगवानराव, पाटील प्रदीप बालाजी, किडे संतोष रामा, कत्रे राजेश्वर लक्ष्मणराव, आंबुलगेकर महेंद्र बाबुराव यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, तीन शिक्षकांनी दि. २५.०६.२०२६ रोजी केंद्रप्रमुख पदावर रुजू होऊनही पुन्हा पदोन्नती मागितल्याने त्यांना शा.नि. दि. ०१.०८.२०१९ मधील कलम ५.१.२ (कमीत कमी ३ वर्षे सेवा आवश्यक) नुसार अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने केवळ शिफारस यादी काढली असून प्रत्यक्ष पदस्थापना आदेश अद्याप निघालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये समाधान असले तरी संभ्रम कायम आहे. जिल्हा परिषदेत होणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेनंतर सर्व याचिकाकर्त्यांना प्रत्यक्ष रुजू करून घेण्याचे आदेश निघण्याची शक्यता असून, सर्व याचिकाकर्त्या शिक्षकांचे लक्ष आता पदस्थापना आदेशाकडे लागले आहे.
अनेक वर्षांपासून आम्ही TET पात्र असूनही पदोन्नतीपासून वंचित होतो. न्यायालयाने दिलासा दिला असून आता जि.प.ने तात्काळ पदस्थापना द्यावी," अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्या शिक्षकांनी दिली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group