कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे शानदार वितरण नांदेड/प्रतिनिधी-स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षातही मराठवाड्याच्या विकासाचा अनुश...
कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे शानदार वितरणनांदेड/प्रतिनिधी-स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षातही मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरुन निघाला नाही. विकासासाठी सजग आणि निर्भिड पत्रकारितेसोबतच सजग नागरिकांची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
दिवंगत कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानच्यावतीने दिल्या जाणार्या जीवनगौरव, पत्रकारिता व प्रेरणादायी संघटक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून दै.प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, माजी नगरसेवक ऍड.विनायकराव नांदेडकर, नांदेड मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्रसिंघ गाडीवाले, उद्योजक नौनिहालसिंघ जहागिरदार, मनपातील कॉंग्रेस व वंचित आघाडीचे गटनेते इंजि.प्रशांत इंगोले आदी उपस्थित होते. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक स.लड्डूसिंघ महाजन, किनवट नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान यांचा जीवनगौरव तर दै.श्रमिक एकजूट पुरस्कृत कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता पुरस्कार लोह्याचे ज्येष्ठ पत्रकार रत्नाकर महाबळे, विडी व सफाई कामगार क्षेत्रातील उत्कृष्ट संघटक पुरस्कार कॉ.मिना हटकर व कॉ.वैशाली धुळे तर ग्राम रोजगार सेवक संघटनेतील उत्कृष्ट संघटक पुरस्कार कॉ.प्रकाश बैलकवाड यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलतांना सुजात आंबेडकर म्हणाले की, मराठवाडा निझामाच्या गुलामगिरीतून मुक्त होवून 78 वर्षे झाली. एकट्या मराठवाड्याने राज्याला तीन-तीन मुख्यमंत्री दिले. तरी देखील मराठवाड्याचा विकास होवू शकला नाही. मराठवाड्यातील शिक्षण, सिंचन, पाणी, उद्योगाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत आहे. विकासात माध्यमांची म्हणजे पत्रकारितेची महत्वाची भूमीका अलिकडच्या काळात अनेक मोठ्या साखळी माध्यमांवर अदानी, अंबानी सारख्या भांडवलदारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासाहर्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. मराठवाड्याच्या विकासाला खर्या अर्थाने सत्तेला जाब विचारणारे नागरिक आणि पत्रकारांची गरज आहे. नांदेड वार्ता सारखी बोटावर मोजण्या इतकी वृत्तपत्रे हे आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. म्हणून गोदी मिडियाची चर्चा होवू लागली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्यात छोटे-छोटे बंधारे बांधुन पाण्याचे सिंचन व्हावे असे अपेक्षित होते. परंतु मोठे धरणं बांधुन गुत्तेदारांची आर्थिक तहान भागली. मात्र या भागातील नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड मात्र आपण कमी करु शकलो नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शंतनु डोईफोडे यांनी कॉ.अनंतराव नागापूरकर हे या भागातील कामगारांना पडलेले एक सुंदर स्वप्न होते. त्यांची भूमीका कामगारांसोबत उद्योगही वाचला पाहिजे अशी होती. असे कामगार नेते आता फार कमी आहेत. त्यांचा वारसा सांभाळणे कठीण असले तरी त्यांच्या विचारातून निर्माण झालेला लाल बावटा प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सत्काराला उत्तर देतांना लड्डूसिंघ महाजन व इसाखान यांनी कॉ.अनंतराव नागापूरकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तर अध्यक्षीय समारोपात प्रविण पाटील यांनी सुजात आंबेडकर सारख्या तरुणांनी केवळ राजकारणात नाही तर सत्तेत सहभागी झाले पाहिजे असे मत व्यक्त करतांना केवळ घराणेशाही म्हणून नाही तर उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात आणि सत्ताकारणात येण्याची आता खर्या अर्थाने गरज आहे. कॉ.अनंतराव नागापूरकर हे उच्च शिक्षित असूनही कामगार, कष्टकर्यांसाठी आयुष्यभर लढले. त्यांचा वारसा नांदेडमध्ये कॉ.प्रदीप पुढे नेत आहेत असे गौरवोद्गार काढत नांदेड वार्ताच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी तर फारुख अहमद यांनी मनोगत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार राम तरटे यांनी केले. पुरस्कारार्थींच्या मानपत्राचे वाचन अविनाश पाटील, राज गोडबोले, कॉ.देवराव नारे, कॉ.उज्वला पडलवार, सदानंदी नागापूरकर, कॉ.प्रफुल्ल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र मोदी, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी पवार, कॉ.शिवाजी फुलवळे, प्रसाद नागापूरकर, कॉ.गणेश संदुपटला, हुसेन शेख, सय्यद मलंग, कॉ.भगवान नाईक, एन.टी.कांबळे, संजय लष्करे, नागसेन डोंगरे आदींनी प्रयत्न केले.

COMMENTS