देगलूरला बाह्य वळण रस्ता मंजूर करा खा. डॉ. गोपछडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट

देगलूर : शहरातील वाढता वाहतुकीचा ताण कमी करून मुख्य बाजारपेठेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी शहराबाहेरील ३३ मीटर रिंग रोडला राष्ट्रीय महामार्...

देगलूर : शहरातील वाढता वाहतुकीचा ताण कमी करून मुख्य बाजारपेठेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी शहराबाहेरील ३३ मीटर रिंग रोडला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३चा बाह्य वळण रस्ता (बायपास) म्हणून मंजुरी द्यावी, तसेच कारेगाव ते बागणटाकळी बायपास रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली.

यासंदर्भात २ सप्टेंबर रोजी पन्हाळगड निवासस्थानी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार आदी उपस्थित होते.
देगलूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते नगरपालिका मुख्य बाजारपेठ हा २१ मीटर रुंदीचा फीडर रोड आहे. हा मार्ग शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतून जात असून त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, बँका, रुग्णालये, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्याचे अतिरिक्त रुंदीकरण किंवा चौपदरीकरण केल्यास व्यापारी, नागरिक तसेच पादचाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
सन १९६४ व १९९४च्या विकास आराखड्यांमध्ये हा रस्ता २१ मीटर रुंदीचा फीडर रोड म्हणून दर्शविण्यात आला आहे. याच रुंदीनुसार नगर परिषदेने बांधकाम परवानग्या दिल्या असून रस्त्यालगत नाल्यांची कामे व इतर आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. २००८च्या गुरू-ता-गद्दी कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या वेळीही २१ मीटर रुंदी गृहीत धरण्यात आली होती. २०२६च्या नवीन विकास आराखड्यातही हा रस्ता २१ मीटर रुंदीचाच प्रस्तावित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच कारेगाव ते बागणटाकळी बायपास रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणीही करण्यात आली. या मार्गाचा विकास झाल्यास देगलूरच्या बाह्य वाहतूक व्यवस्थेला सक्षम पर्याय उपलब्ध होऊन शहरातील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.बाह्य वळण रस्ता विकसित झाल्यास अवजड वाहतूक शहराबाहेरून वळविता येईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि बाजारपेठेवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर देगलूरची पारंपरिक बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने आणि शहराची विद्यमान रचना सुरक्षित राहणार आहे.
त्यामुळे अण्णाभाऊ साठे चौक ते नगरपालिका मुख्य बाजारपेठ या २१ मीटरच्या फीडर रोडचे प्रस्तावित अतिरिक्त रुंदीकरण व चौपदरीकरण न करता शहराबाहेरील ३३ मीटर रिंग रोडला NH-63चा बाह्य वळण रस्ता म्हणून मंजुरी द्यावी. तसेच कारेगाव-बागणटाकळी बायपासच्या चौपदरीकरणास प्राधान्य देऊन आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे.
बाजारपेठेवरील ताण टाळणार
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३चा सध्याचा मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने अवजड वाहनांसह वाढत्या वाहतुकीचा ताण मुख्य बाजारपेठेवर पडत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील रस्ता रुंद करण्याऐवजी शहराबाहेरील ३३ मीटर रिंग रोडचा NH-63चा बायपास म्हणून विकास करणे हा अधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन पर्याय असल्याचे खासदार डॉ. गोपछडे यांनी निवेदनातून स्पष्ट केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group