नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड; संघटनेच्या एकजुटीला नवी दिशा
नांदेड/ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या देगलूर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी डी. जी. रातोळीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी सर्वानुमते निर्णय घेत देगलूर तालुका तलाठी संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
तलाठी संघाच्या सचिवपदी प्रकाश तोटेवाड, उपाध्यक्षपदी संग्राम शिंदे, कार्याध्यक्षपदी आनंद करडे, तर कोषाध्यक्षपदी रवी कापसे यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी महेश पदाजी आणि प्रसिद्धी प्रमुखपदी गंगाधर म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली.संघटनेच्या कामकाजाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी संघटक म्हणून संजय भांगे व क्षीरसागर बालाजी यांची निवड करण्यात आली. तसेच महिला प्रतिनिधी म्हणून सुचिता मारकवाड व वर्षा शितोळे यांची निवड करण्यात आली.
प्रवक्तेपदी बळी कदम यांची, तर सल्लागारपदी भास्कर इप्पर व तानाजी डावरगावे यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डी. जी. रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली तलाठी संवर्गाच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित तलाठी बांधवांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
एकमतातून झालेली बिनविरोध निवड ही संघटनेतील एकजुटीचे प्रतीक असून, नव्या कार्यकारिणीकडून तलाठी संवर्गाच्या प्रश्नांसाठी भक्कमपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

COMMENTS