डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अँड मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणे येथील प्राध्यापिका डॉ. कविता योगेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मोनिका दत्तात्रय शिंदे यांनी “Digital Farming Solution Using Neural Network for Early Detection and Identification of Fall Armyworm in Maize” या विषयावर नाविन्यपूर्ण व संशोधनपर प्रबंध यशस्वीरित्या पूर्ण केला.
प्रा. मोनिका दत्तात्रय शिंदे गेल्या १७ वर्षांपासून संगणक अनुप्रयोग (Computer Application) व व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि डिजिटल फार्मिंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केले आहे.
त्यांच्या संशोधनावर आधारित अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर करण्यात आले असून, Springer, Elsevier, UGC CARE, Springer Nature यांसह विविध प्रतिष्ठित प्रकाशनांमध्ये त्यांचे संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच Springer Nature मधील दोन पुस्तक प्रोसिडिंग्समध्येही त्यांच्या संशोधनाचा समावेश आहे.
संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये Best Research Paper पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अध्यापन, संशोधन, बौद्धिक संपदा (IPR) आणि डिजिटल कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.
प्रा. मोनिका दत्तात्रय शिंदे यांच्या संशोधन कार्यावर आधारित एक भारतीय पेटंट प्रकाशित झाले असून, FAWINSTARNet या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संशोधन कार्याचे एक कॉपीराइट प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांच्या संशोधनातून विकसित तंत्रज्ञानाचे Technology Transfer देखील करण्यात आले आहे.
या उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधन यशाबद्दल ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. गणेशराव दुधगावकर, सचिव डॉ. संध्याताई दुधगावकर, सहसचिव मा. इंजि. समीरभाऊ दुधगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख मो. बाबर तसेच एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा. संदीप सरकटे यांनी प्रा. डॉ. मोनिका शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS