नांदेड, १९ ऑगस्ट २०२६:
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक 'पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन' यांच्या जयंतीनिमित्त यशवंत महाविद्यालयात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय ग्रंथपाल दिन अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आधुनिक ग्रंथालयशास्त्राच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. रंगनाथन यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
ग्रंथालय कर्मचारीवर्ग आणि प्राध्यापकवृंदाने डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले. त्यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील अतुलनीय कार्यावर उपस्थितांनी प्रकाश टाकला.
या विशेष जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'डिजिटल डिस्प्ले' प्रणालीचे अनावरण व प्रात्यक्षिक पार पडले. इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना वेबओपेक आणि इलेक्ट्रोनिक्स ई-डेटाबेसचा वापर कसा करावा, याचे तांत्रिक मार्गदर्शन व सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ प्रात्यक्षिक पाहिले नाही, तर स्वतः डिजिटल डिस्प्ले आणि ई-डेटाबेस हाताळून डिजिटल ग्रंथालय प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, सहायक ग्रंथपाल श्री. संजय भोळे, व ग्रंथालय कर्मचारी, श्री. साखरे, श्री. धात्रक, श्री. आलुरवाड, श्रीमती पिंपळपल्ले, श्रीमती विटाळकर आणि श्रीमती कुकुटला यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण मिरकुटे, प्रा. अर्जुन गुरुखुदे, प्रा. संकेत देलमाडे, डॉ. राठोड, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

COMMENTS