नायगाव प्रतीनीधी , दि. १२ ऑगस्ट २०२६ : कृषी महाविद्यालय, नायगाव (बाजार) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE आणि AIA) कार्यक्रमांतर्गत विद्...
नायगाव प्रतीनीधी , दि. १२ ऑगस्ट २०२६ : कृषी महाविद्यालय, नायगाव (बाजार) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE आणि AIA) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी कृषी विज्ञान केंद्र (KVK), सगरोळी येथे शैक्षणिक भेट देऊन कृषी क्षेत्रातील विविध बाबी, आधुनिक शेती तंत्रज्ञान तसेच विस्ताशर शिक्षणाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
भेटीदरम्यान डॉ.प्रवीण चव्हाण (SMS Extension) आणि वेंकट शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना शेतीच्या मूलभूत बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी क्षेत्रातील पिकांची निवड,
जमीन व मृदा व्यवस्थापन, बियाण्यांची निवड, पेरणीच्या योग्य पद्धती, पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर तसेच पीक संरक्षण यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र हेड डॉ माधुरी रेवनवार यांनी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यामध्ये कृषी विस्तार सेवांचे महत्त्व स्पष्ट केले. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, कृषीविषयक मार्गदर्शन, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकरी-कृषी तज्ज्ञ यांच्यातील समन्वय याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रात्यक्षिके, पीक प्रक्षेत्रे, आधुनिक शेती तंत्रज्ञान तसेच कृषीविषयक उपक्रमांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. विद्यार्थ्यांनी कृषी तज्ज्ञांशी संवाद साधून शेतीतील मूलभूत संकल्पना, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि विस्तार कार्यातील संधी याबाबत मौल्यवान माहिती प्राप्त केली.
ही शैक्षणिक भेट ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE आणि AIA) अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण, संस्थेचे संचालक प्रा. आर. सी. लव्हेकर, प्राचार्य डॉ. आर. जी. नादरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा. नागेश घुबे, RAWE समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, RAWE कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. ए. शेंडगे व मुलींच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. नीता देवकते यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली.

COMMENTS