नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारा...
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक नांदेड जिल्हयात रवाना केले होते.
सदर पथकाने, दिनांक 16.08.2026 रोजी सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे किवळा गावातील सोलार प्लँटच्या पाठीमागे शेतातील मोकळया जागेत जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, 50,080/-रुपयांची रोकड, (5) मोबाईल, (4) मोटार सायकली असा एकूण 3,45,080/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (12) इसमांवर कारवाई करुन, त्यांचेविरुध्द सोनखेड पोलीस ठाणे येथे गुरनं 199/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये नोंदवून, त्याचा तपास सोनखेड पोलीस ठाण्यातील पोहेकॉ वामन नागरगोजे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/ गणेश राठोड, पोहेकॉ/ संदिप वाघाडे व पोहेकॉ/ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
खबर ' हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

COMMENTS