कंधार , संवावदाता, दि.१८ अगस्तकंधार आणि लोहा तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्र...
कंधार , संवावदाता, दि.१८ अगस्तकंधार आणि लोहा तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने ऐतिहासिक कंधारचा विकास करून पुन्हा वैभव प्राप्त करून देऊ, असे शिवसेना शेतकरी परिषदेचे प्रमुख तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी म्हटले आहे.
सध्या कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागासह शहरातील तरुणांचा ओघ शिवसेनेकडे वाढला आहे. रविवार रोजी अब्दुल रहीम खान व त्यांच्या शेकडो मित्रांनी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (शिंदे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे, माऊली तिडके, संतोष कागणे, सुनील हराळे आदी उपस्थित होत.
याप्रसंगी शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, कंधार हे ऐतिहासिक व साधू संताची भूमी असलेल शहर आहे. जगत्तुंग तलाव व भुईकोट किल्ला हे या शहराला मिळालेली देणगी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विकासाचा मोठा दृष्टिकोन असून, त्यांच्या माध्यमातूनच कंधारला निधी उपलब्ध झाल्यास विकास होऊ शकतो. शिवसेनेची दारे प्रत्येक घटकासाठी खुली आहेत. मुस्लिम तरुणांच्या या प्रवेशामुळे पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे.
सध्या कोणत्याही निवडणुका नसल्या तरी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हजारो जुने सहकारी, तरुण कार्यकर्ते शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुस्लिम समुदायाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत झालेला प्रवेश हा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

COMMENTS