स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माय भारत, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "नशा मुक्त युवा – ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माय भारत, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "नशा मुक्त युवा – विकसित भारत" या जनजागृतीपर कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते, तर माय भारत नांदेडच्या जिल्हा युवा अधिकारी अशनी कानकटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून देशभरातील युवकांशी संवाद साधत व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी युवकांची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करत व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार, सुदृढ समाजनिर्मिती आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांनी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमा
मागील उद्देश स्पष्ट करत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी जागरूक नागरिक म्हणून पुढाकार घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
प्रमुख पाहुण्या अशनी कानकटे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यसनमुक्तीचे सामाजिक महत्त्व, युवकांची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार याविषयी उपस्थितांना प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. समारोपप्रसंगी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना "नशामुक्त भारत" घडविण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नंदकुमार बोधगिरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कर्मचारी बंडू कांबळे, सिस्टीम एक्सपर्ट विभागाचे विजय हनवते, सह्याद्री पगडे, नरसिंग कागडा यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दृढ करण्यास तसेच 'विकसित भारत' या संकल्पनेला बळकटी देण्यास हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

COMMENTS